राजिप शाळा वडगावची उत्तुंग भरारी,
राज्यस्तरीय व राष्ट्रीय नवी दिल्ली च्या पोर्टल वर शाळेची रचली यशोगाथा
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २९ जुलै,
रायगड जिल्हा परिषद तथा उच्च शाळा वडगांव नेहमी आपल्या विविध व नावीन्यपूर्ण उपक्रमाने कायम चर्चेत असल्यामुळे.या उपक्रमांची दखल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन MIEPA या संस्थेने,व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन NIEPA या संस्थेने घेतली असून आपल्या राष्ट्रीय पोर्टलवर या शाळेची यशोगाथा आपल्या पोर्टलवर प्रकाशित केली आहे. दखल झाल्यामुळे या शाळेचे विशेष कौतुक होत आहे.
या शाळेमध्ये अनेक उपक्रम सादर करुन तालुक्यासह जिल्ह्यात नावारुपाला आली यामधे शाळा गैरहजर विद्यार्थ्यांच्या दारी,भात लावणी,स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती,एक पेड माँ के नाम,चला वाचूया वाचन चटई, रिडींग गार्डन,भाषा,गणित प्रयोगशाळा,बिर्ला कार्बन कडून रंगरंगोटी,अल्काईल अमाईन्स कडून संगणक व विज्ञान कार्यशाळा,मर्क लाईफ सायन्स कडून स्मार्ट ई क्लासरूम ,एक्झॉनमोबिल कडून शैक्षणिक मदत,ज्युबिलीएन्ट कडून मुस्कान किताबघर अनेक व्यावसायिक कंपन्यांकडून शाळेसाठी सीएसआर च्या फंडातून कोट्यवधी रुपये शाळेच्या विकासाठी देण्यांत आले या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यांत आले.
जिल्हा परिषदेच्या तात्कालीन शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, उपशिक्षणाधिकारी - शेडगे,सुनील भोपळे,डॉ.इरफान ईनामदार - डायट पनवेलचे प्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.पंचायत समिती खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करत राष्ट्रीय स्तरावर पोहचविणारी म्हणून शाळेकडे पाहिले जाते.
या शाळेच्या शिक्षकांचे कौतुक होत आहे.मुख्याध्यापक सुभाष राठोड,सहशिक्षक वैजनाथ जाधव,पदवीधर शिक्षिका मयुरी धायगुडे यांचे योगदान असून शाळा व्यवस्थापन समिती,ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांचे सहकार्य लाभत आहे.

0 Comments