वास्तुशास्त्र नुसार निरोगी जीवनाचे रहस्य व उपाय

 वास्तुशास्त्र नुसार निरोगी जीवनाचे रहस्य व उपाय 

वास्तु च्या रचनेनुसार आपल्या स्वास्थ संबधी तक्रारी व त्याचे निवारण.


माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : 29 जुलै,
 

               आपण वास्तुशास्त्र हे घराच्या,ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी दिशेनुसार त्याचे लाभ  किंवा शारीरिक तक्रारिंना कारणीभूत ठरताना दिसत आहेत यावर चर्चा करणार आहोत.नेहमी म्हटल्याप्रमाणे वास्तुशास्त्र हे हजारो वर्षांपूर्वी पासून उपयोगात येत असून याची सार्थता ही अनेक प्राचीन ग्रंथातून दिसुन त्याचे दाखलेही दिले गेले आहेत, म्हणूनच हे शास्त्र कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी न घालता निसर्गनिर्मित उपाययोजना यानुसार काम करीत आले आहे.समजा तुमची आर्थिक परिस्थिती खुप चांगली आहे पण स्वास्थ संबंधी तक्रारी असतील तर जे वडिलोपार्जित किंवा स्वतः कामावलेल धन /पैसा आहे ते एके दिवशी समाप्त होणार आहे.
               तर वास्तुशास्त्राप्रमाणे यावर कसे परिणाम होतात हे आपण पुढीलप्रमाणे पाहुयात.
जर आपल्या घरात /ऑफिस मध्ये /दुकानात उत्तर आणि ईशान्य दिशेच्या मधोमध जर काही दोष असतील तर हमखास आपल्याला किंवा घरातील व्यक्तींना काहीना काही आजारपण हे असणारच म्हणजेच, उदाहरणार्थ जर या दिशेला तुमचे टॉयलेट आले किंवा तुम्ही कचऱ्याचा डब्बा तिथे ठेवलात तर तो वास्तु्दोष तुम्हाला स्वास्थ संबंधित तक्रारी देईल.
             त्याच बरोबर  भिंतीचा रंग पिवळा, सोनेरी लाल असेल किंवा तिथे पडदे या रंगाचे असतील तर ते आजारपणाला कारणीभूत ठरतील कारण ही दिशा पंचतत्वातील म्हणजेच पृथ्वी,आकाश,अग्नी,जल,वायू यापैकी जल या तत्वाचे प्रतिनिधित्व करते म्हणूनच पिवळा,सोनेरी,लाल रंग हे अग्नी तत्व असून पाणी आणि अग्नी एकत्र आल्याने वास्तु्दोष निर्माण होते शिवाय टॉयलेट, कचरापेटी हे डिस्पोजर /टाकाऊ असल्याने त्याचे जलतत्व वर परिणाम होते.
                या जागेत स्टोरेज,कपाट आल्याने किंवा एखादी चौकोनी वस्तू आल्याने स्थायी स्वरूपात ठेवल्याने पृथ्वीतत्व म्हणजेच जडत्व येते आणि वास्तु्दोष निर्माण झालेले दिसुन येते.यात आता दुसरी दिशा म्हणजे  दक्षिण आणि नैरूत्य यांच्या बरोबर मधोमध असलेली दिशा म्हणजे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ह्या दिशेला जर त्या व्यक्तीचे टॉयलेट आले तर उत्तम पण जर या ठिकाणी व्यक्ती चे बेडरूम आले तर स्वास्थ संबंधी जास्त मोठ्या तक्रारी तर काही प्रमाणात कॅन्सर सारखे गंभीर आजरही झालेले वास्तू परीक्षणात आम्हाला दिसुन आलेले आहेत.
               जर या दिशेत आपली औषधे ठेवली आहेत तर औषधं त्यांचा परिणाम पाहिजे तसा मिळण्यासाठी मदत करणार नाहीत कारण वास्तुमधील हा भाग डीस्पॉझल/टाकाऊ भागाचे प्रतिनिधित्व करते.आपल्या वास्तु परीक्षणात आम्हाला अनेकदा आढळले आहे की आग्नेय ला स्वयंपाक घर तर केले आले पण त्याचसोबत सोबत या दिशेला पॅन्ट्री/ स्टोरेज (स्वयंपाक साठी लागणारे धान्य /सामान )ठेवले आहे यातून ते उपभोगले असता याचाही परिणाम आजारपण येण्यास कारणीभूत ठरत आहे.
          थोडक्यात या वरील दोन्ही दिशा सोबतच इतर आणखी दिशादोष असतील तर कोणते आजार ओढाऊ शकतात याची थोडक्यात माहिती घेऊयात 
1) हृदय:- संबंधित नैरूत्य दिशा 
2)किडनी:- संबंधित उत्तर आणि उत्तर ईशान्य यातील मधली दिशा म्हणजेच नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट 
3)लिव्हर:- पुर्व आणि आग्नेय यांच्या मधली दिशा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट 
4)मूळव्याध:- दक्षिण आणि नैरूत्य याच्या मधली दिशा 
5)मस्तीष्क, मेंदू :- उत्तर दिशा 
6) गॅसेटिक, डायजेशन, पोटासंबंधी तक्रारी :- वायव्य दिशा 
7)आणि सर्व जनरल शारीरिक तक्रारी 
                 आपण सर्वात आधी पहिल्याप्रमाणे उत्तर आणि ईशान्य दिशेतील मधला भाग म्हणजेच नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट शिवाय आणखी एक सर्वात महत्वाचे म्हणजे ईशान्य दिशेला तोंड करून चोवीस तासातून एकदातरी दहा ते पंधरा मिनिटे मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करून ध्यानधारणा करणे, सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण सततच्या प्रयत्नाने आपण एक चिंतामुक्त जिवन जगण्यास सुरुवात करू कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात जास्त स्ट्रेस येणे हे जीवावर बेतताना आपल्या सर्वांनाच दिसण्यात आलेले आहे.
              वरील सर्व माहिती ही प्राचीन ग्रंथातून तसेच ग्राहकांच्या वास्तु परीक्षण अभ्यासातूनच प्रसारित करीत आहोत पुन्हा एकदा मी हेच म्हणेल की हे गूढ विज्ञान कोणत्याही अंधश्रद्धेला वाव देत नसून किंवा मेडिकल सायन्सला चॅलेंज देत नसून वास्तु सौख्य लाभण्यासाठी आणि निरोगी जिवन जगण्यासाठी आपणाला प्रेरित करेल,आणि आजारी होऊन नंतर औषधे घेण्यापेक्षा काही लहानशा सवयी,चेंजेस केले गेले तर नक्कीच याचा उपयोग आपल्या परिवाराला होईल.


 महेश निमणे
वास्तु व अंक शास्त्र तज्ज्ञ 9112781986
सुखी वास्तु स्पिरिच्युअल सर्व्हिसेस

Post a Comment

0 Comments

माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!