चौक ग्रंथालय येथे लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी

 चौक ग्रंथालय येथे लोकमान्य टिळक यांची १०५ वी   पुण्यतिथी साजरी




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक : १ ऑगस्ट,

              लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असून स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे.आणी तो मी मिळवणारच! असे सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक आज त्यांची १०५ वी पुण्यतिथी असल्यामुळे अनेक ठिकाणी साजरी करण्यांत आली.मात्र चौक येथे त्यांच्याच नावाने स्थापना झालेली ग्रंथालय आजही मोठ्या डोलाने उभी आहे.शंभर वर्ष होवूनही आजही ती अखंड अविरतपणे सुरु आहे.आज त्यांची पुण्यतिथी असल्यामुळे प्रथम त्यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन या ग्रंथालयांच्या माध्यमातून साजरी करण्यांत आली.
              लोकमान्य टिळक यांच्या स्वर्गवासी झाल्यानंतर काहीच दिवसा मध्ये या ठिकाणी हे ग्रंथालय सुरु करण्यांत आल्यांचे सांगण्यात येत आहे.आज या ठिकाणी वाचकांची संख्या तर आहेत.मात्र त्याहीपेक्षा  पुस्तकांची संख्या हजारोच्या घरात आहे.विशेष म्हणजे चौक ला ऐतिहासिक वारसा लाभला असून या माध्यमातून आजवर अनेकांनी या ग्रंथालयास भेट देण्यांत आली.काही सामाजिक संस्था तसेच औद्योगिक कारखाने यांचे मोलाचे योगदान ठरत आहे.
          या ग्रंथालयाच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षा,वाचन कट्टा, महिला वर्गांसाठी विविध उपक्रम,ग्रंथ प्रदर्शन,व्याख्यान,थोर पुरुषांचे कार्यक्रम असे अनेक उपक्रम या ठिकाणी घेतले जाते.यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष - सुरेश आप्पा वत्सराज व जेष्ठ कार्यकारिणी सदस्य मार्गदर्शक डॉ. अपर्णा वाळिंबे,विश्वस्त व कार्यकारी सदस्य,स्टेट बॅक ऑफ इंडिया, शाखा चौक चे व्यवस्थापक कामिनी ढेरे, कोषाध्याक्ष  तुषार जगताप,तसेच या कार्यक्रमाची व्यवस्था  ग्रंथपाल अभिजीत चौधरी यांनी केले.आभार प्रदर्शन मुरलीधर साखरे यांनी केले.





Post a Comment

0 Comments

चौक ग्रंथालय येथे लोकमान्य टिळक यांची १०५ वी   पुण्यतिथी साजरी