उद्योजक दिनेश सोनावणे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप...
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २१ जुलै,
पनवेल येथील सम्यक पेपर इंटरप्राईझेस यांच्या माध्यमातून आपटा ग्रामपंचायत हद्दीतील बागेचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी होनेस्टी डेव्हलोपर्सचे मालक उद्योजक दिनेश सोनावणे, सम्यक इंटरप्राइजेसचे पौर्णिमा सोनावणे, यांच्या माध्यमातून दुर्गम भागातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागेचीवाडी येथील गोर गरीब गरजू ८५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदतीचा हात हात दिला आहे, त्यांच्या या उपक्रमाबद्दल शिक्षकांनी त्यांचे आभार मानले आहेत.यावेळी ग्रामस्थ अमोल तीवले आदिसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments