रायगड जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्षपदी दिलीप मनेर , कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष पदी रोहित विचारे तर खालापूर शाखाप्रमुख पदी भालचंद्र भोसले यांची निवड

 रायगड जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्षपदी दिलीप मनेर , कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष पदी रोहित विचारे तर खालापूर शाखाप्रमुख पदी भालचंद्र भोसले यांची निवड




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २१ जुलै,

            खोपोली येथे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. मा. उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.खालापूर नगर पंचायत चे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मणेर यांची रायगड जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्षपदी करण्यात आली असून आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी रोहित विचारे यांची कर्जत खालापूर विधानस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
              शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करण्यासाठी व आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना नविन जबाबदारी देत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते पदनियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. 
            तसेच खालापूर शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक भालचंद भोसले यांची खालापूर शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा रोशना मोडवे, खालापूर शहर अध्यक्ष पद्माकर पाटील, सभापती किशोर पवार , नगरसेविका सुप्रिया साळुंखे,युवा नेते हरेश मोडवे, अमित जगताप युवासेना शहर प्रमुख दिपक पाटील शहर संघटक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर