राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत, होराळे,वडगाव येथिल शेतक-यांस शाश्वत शेती विषयी मार्गदर्शन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
होराळे / वडगाव : ८ ऑगस्ट,
शेतक-यांनी जास्तीत जास्त शेती लागवड करुन अधिक उत्पन्न घ्यावे यासाठी वडगाव तसेच होराळे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या जन्म दिवसानिमित्ताने शाश्वत शेती,या माध्यमातून राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. मांडवकर,यांनी शेतकऱ्यांना शाश्वत शेती व नैसर्गिक शेती, जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, अच्छादन या विषय सखोल मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी निंबाळकर यांनी शाश्वत शेतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरी,असून शाश्वत शेती, नैसर्गिक शेती ,कृषी विभागातील विविध योजना शेतकऱ्यांना माहिती दिली.प्रभारी मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडिक यांनी देशी गायीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले.उप कृषी अधिकारी खालापूर सुरेश उघडा यांनी शेतकऱ्यांना खोड किडा, सुरळीतील अळी, पाणी गुंडाळणारी अळी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणास ग्रुप ग्रामपंचायत होराळे सदस्य सुरेखा दळवी, गटाचे अध्यक्ष विश्वास साळवी, उपाध्यक्ष अविराज बुरुमकर, सचिव हातनोलकर, गटातील कृषी सखी दर्शना पवार,वडगाव येथिल मा.सरपंच महादेव गडगे,गटाचे अध्यक्ष हनुमंत पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर जांभुळकर, सचिव भीमराव गाताडे, गटातील कृषी सखी मीनाक्षी पाटील.आत्मा बी टी एम प्रज्ञा पाटील यांनी प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी शेटे व गटातील सदस्य अंकुश शेलार व सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


0 Comments