राजिप शाळा,माजगाव येथे रक्षाबंधन साजरा,विद्यार्थ्यांनी स्वताहून बनबिल्या राख्या

 राजिप शाळा,माजगाव येथे रक्षाबंधन साजरा,विद्यार्थ्यांनी स्वताहून बनबिल्या राख्या

         



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगाव  : ८   ऑगस्ट

               शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना वस्तू निर्मितीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.यामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा माजगाव येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना टाकावू वस्तू पासून हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तिरंगा राख्या तसेच भेटकार्ड तयार केले.सदर विद्यार्थ्यांनी स्वताहून राखी बनवत आज बनविलेली राखी शाळेतील असलेले विद्यार्थी यांस भाऊ म्हणून बांधण्यांत आली.

       विद्यार्थ्यांना राख्या निर्मितीचे शिक्षण देण्यात आल्यांने त्यांनी सहज पणे राख्या बनविल्यामुळे पालक वर्गांनी त्यांचे कौतुक केल्यांचे पहावयांस मिळाले.
               

  शाळा ही विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेत व्यवहारी ज्ञान देण्यांचे काम करीत आहे.कोणतीही वस्तू  गुणवत्ते नुसार बनविली  जाते.मात्र त्यासाठी आपले कौशल्य अतिषय महत्वाचे आहे.मुख्याध्यापिका रेखा जाधव यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यांचे  शिक्षक भूषण पिंगळे, अर्चना शेलार व घनश्याम तीखंडे यांनी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर