गोदरेज प्रॉपर्टी लि.यांच्या वतीने रक्त दान शिबीरांचे आयोजन,कामगारांनी केले रक्तदान

 गोदरेज प्रॉपर्टी लि.यांच्या वतीने रक्त दान शिबीरांचे आयोजन,कामगारांनी केले रक्तदान 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ९ ऑगस्ट,

             रक्त दान सर्वात मोठे दान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र आपण रक्त दान करुन अनेकांचे आपण प्राण वाचवू शकतो.अपघात अथवा अन्य आपत्ती आल्यास आपणांस मानवी रक्ताची खूप आवश्यकता भासत असते.हे उदिष्टे डोळ्यासमोर ठेवून गोदरेज प्रॉपर्टी लि.व गोदरेज वूड साईट यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.यावेळी कामगार वर्गांनी रक्त दान करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचा प्रयत्न केला. 
                 रक्ताचा तुटवडा निर्माण होण्यांची अनेक कारणे जरी असली तरी सुद्धा रक्त दान करुन आपण हा तुटवडा भरुन काढू शकतो.कारण रक्त आपण निर्माण करु शकत नाही.मात्र ते दान करु शकतो.तसेच आजच्या तरुण वर्गांस रक्त दानांचे महत्व समजले असून स्वता हून पुढाकार घेत रक्त दान करीत असतात.
          यावेळी गोदरेज प्रॉपर्टी लि.गोदरेज वूड साईट नावंढे ,कर्जत बाय पास रोड येथे सोमय्या हॉस्पिटल यांच्या टिम च्या उपस्थित तसेच डॉक्टर, नर्स, अधिकारी,व्यवस्थापक,तसेच ह्या उपक्रमाचे ॲडमिन योगेश तेलवणे यांच्या माध्यामातून हा कार्यक्रम घेण्यांत आला.

Post a Comment

0 Comments

माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!