सामाजिक कार्यकर्ते मारुती ज.ढवाळकर यांचा स्तुत्य उपक्रम

 गवताची छाटणी करुन विद्यार्थांस दिलासा,

सामाजिक कार्यकर्ते मारुती ज.ढवाळकर यांचा स्तुत्य उपक्रम 

को.ऐ.सो शाळेचा परिसर झाले चकाचक 


माजगांव : २ ऑक्टोंबर 
  
              कोणतेही समाज कार्य करण्यांसाठी आत्मियता असणे महत्वाचे आहे.ती असल्यांस माणूस स्वताला समाज कार्यासाठी झोकून देत असतो.कोकण ऐज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगांव येथे पावसाळ्यात निर्माण झाले गवत हे विद्यार्थ्यांसाठी  धोकादायक ठरत असतांना माजगांव येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय दांडगा अनुभव असलेले व्यक्तीमत्व मारुती ज.ढवालकर यांनी स्व खर्चाने या ठिकाणी गवताची छाटणी करुन विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा दिला आहे.
         ही शाळा आठवी ते दहावी पर्यंत असल्यामुळे या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यांसाठी येत असतात.मात्र या ठिकाणी वाढलेल्या गवतामधून मार्ग क्रमित करतांना अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे त्यातच पावसाळ्यांचे दिवस,यामुळे सर्पटणा-या सापाची भिती अधिकच असून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
         या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत निर्माण झाले होते.मात्र कोणतीही भावना मनामध्ये न  ठेवता सामजिक कामामध्ये सातत्याने योगदान असलेले मारुती ढवाळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मजूर लावणी या शाळेचा परिसर स्वच्छ केला.आपण केलेल्या कामामुळे दुस-यास आनंद मिळत असेल तर आपण कोणतेही काम सातत्याने करण्यांसाठी तत्पर असल्यांचे सामजिक कार्यकर्ते मारुती ढवाळकर यांनी बोलतांना सांगितले. 


Post a Comment

0 Comments

सामाजिक कार्यकर्ते मारुती ज.ढवाळकर यांचा स्तुत्य उपक्रम