अभिष्ठचिंतानांचे औचित्य साधत महाआरोग्य शिबीरांचे आयोजन

  अभिष्ठचिंतानांचे औचित्य साधत महाआरोग्य शिबीरांचे आयोजन,लायन्स क्लब अध्यक्ष खालापूर किशोर पाटील यांचा पुढाकार





माजगांव :  : १२ नोव्हेंबर,


            लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष यांच्या अभिष्ठचिंतानांचे औचित्य साधत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.त्याच बरोबर मोहपाडा येथे शिव भोजनथाळी  वाटप करण्यांत आली.राजिप शाळा कोकण एज्युकेशन सोसायटी शाळा माजगाव विद्यार्थ्यांस खाऊ वाटप करण्यात आले.आजचा दिवस हा अनेकांचे अशिर्वाद घेवून साजरे करावे,या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.या शिबीरांचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर माजगाव येथे करण्यांत आले.यावेळी प्रत्येकांनी आपली आरोग्य तपासणी करण्यांत आली.तसेच या निमित्ताने आलेल्या प्रत्येक रुग्णांनी त्यांस अभिष्ठचिंतानांचे शुभेच्छा दिल्या.

              दिवसेंदिवस आजार हे सातत्याने वाढत जात असतात.मात्र वाढती महाघाई मुळे आपण आपल्या शरीराकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असतो.मात्र येणार आजार उग्र रुप धारण करु नये यासाठी महाआरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यांत आले.यावेळी शुगर,ब्लड स्पेशर,ईसीसी,नेत्र तपासणी,रक्त दान शिबीर,अदि शारिरिक तपासणी मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर,सनशाईन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल पनवेल अदि डॉक्टरांचे सहकार्य लाभले.

            यावेळी या महाआरोग्य तपासणी शिबीरात शेकडो रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी केली.ग्रुप ग्रामपंचायत सरपंच दिपाली नरेश पाटील सदस्य राजेश पाटील,शशिकांत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर उपाध्यक्ष - जयवंत पाटील,राष्ट्रवादि नेते संतोष बैलमारे,जिल्हा परिषेद उमेद्वार - उत्तमशेठ भोईर,ग्रामपंचायत वडगांव मा.सदस्य नंदू पाटील,लायन्स लहू भोईर,जितेंद्र सकपाळ,हरिभाऊ जाधव,मारुती ढवाळकर मंगेश पाटील,रमेश जाधव,चंद्रकांत पाटील,सूर्याजी भाऊ पाटील,संदीप जाधव,बाजीराव ढवालकर,बंटी पाटील,मछिंद्र पाटील,संजय पाटील,बबन पाटील,रमेश ढवाळकर,रमण ढवालकर,दिलीप काठावले,सचिन काठावले,रविंद्र पाटील,पुंडलिक काठावले,एकनाथ ढवाळकर,दत्तात्रय जांभळे,हरीश पाटील,विलास कांबळे,व सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत पाटील यांनी केल.







 

Post a Comment

0 Comments

माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!