सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड यांची पत्रकार परिषद,शाळेचा भोंगळ कारभाराचा केला पर्दाफाश

 सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड यांची पत्रकार परिषद,शाळेचा भोंगळ कारभाराचा केला पर्दाफाश 


माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
मोहपाडा : १० जानेवारी 


        शाळा ही विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात महत्वाचे काम करते मात्र महिला उद्योग मंडळाची पारडे येथील असलेली या  शाळेच्या संदर्भात होत, असलेला भोंगळ कारभारा विषयी सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड यांनी मोहपाडा येथील साई बाबा मंदिर येथे पत्रकार परिषद घेत शाळेचा भोंगळ कारभारा विषयी पर्दाफाश केला.यावेळी या शाळेच्या मनमानी कारभारा विषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
             नुकताच महिला उद्योग मंडळ या शाळेचे व्यवस्थापनाकडून कडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड आकाश कांबळे, शिवेंद्र शिगवण यांची जणिव पूर्वक बदनामी करण्यांत आल्याचे त्यांना समजताच  आपले मत मांडण्यासाठी शाळेचा भोंगळ कारभार पालक वर्ग यांच्या निदर्शनास आणण्यासाठी गायकवाड यांनी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.सदर शाळेची स्थापना १९८५ झाली असल्याचे समजते.मात्र शाळेची भरमसाठ वाढत जाणारी फी पालक वर्गाची डोके दुखी होत आहे. मात्र आम्ही दबाव आणल्यामुळे आदिवासी बांधवांची फी माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
           सदर या शाळेचा होत असलेला भ्रष्ट कारभार,गैर व्यवहार थांबला जावा यासाठी अनेक वेळा विविध ठिकाणी पत्र व्यवहार करण्यात आला आहे.तसेच धोकादायक शाळे मुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे.त्याच बरोबर महिला उ‌द्योग मंडळाचे लावलेले आरोप फेटाळून लावत जी सत्य परिस्थिती आहे त्याची कागदोपत्री माहिती दिली. की शाळेचा तसेच संस्थेचा गैरव्यवहार कशा प्रकारे सुरू आहे. तसेच मा. धर्मादाय आयुक्त रायगड, शिक्षण विभाग अलिबाग यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारी तसेच, प्राथमिक शिक्षण विभागाचे उपसंचालक यांना सुद्धा पत्रव्यवहार केला दाखविण्यात आले.संस्थेविरुद्ध गैरव्यवहाराची कारवाई सूरू असून, मान्यता रद्द करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत केली.लवकरच पालक वर्गांना विश्वासात घेऊन त्यांना आपले म्हणणे सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज