परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारात दादाच्या आठणीने कंठ दाठला,

 परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारात दादाच्या आठणीने कंठ दाठला,

विकासाचे धोरण पूर्ण होण्यासाठी बहुमूल्य मत देऊन दादाचे स्वप्न पूर्ण करा 

प्रचाराची सर्व सूत्रे मराठा समाजाचे नेते उत्तम शेठ भोईर कडे 


माय मराठी न्यूज : वृत्तसेवा  
सावरोली : 29 जानेवारी,



         महाराष्ट्राचे लाडके उप मुख्यमंत्री अजित दादा पवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख नेते यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे काल प्रचारास स्थगिती देण्यांत आली होती.मात्र सावरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीस उभे असलेले संतोष बैलमारे,त्याच समवेत सावरोली पंचायत समिती उमेदवार प्रमिला पाटील,व वाशिवली पुनम म्हात्रे यांनी प्रथम दादास भावपूर्ण श्रद्धांजली वाहून प्रचारास सुरुवात करण्यांत आली.मात्र दादाच्या जाण्यामुळे उमेदवार यांना प्रचार करण्यास स्वारस्य नसले तरी लोकशाहित प्रचार शिवाय मतदान नाही हे तत्व मनाशी बाळगून प्रचारास सक्रिय झाले.
             


     आज दुपार नंतर शांत पद्धतीने प्रचार सुरू असल्याचे पहावयास मिळाले.मात्र दादाच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकारणातील मौल्यवान व्यक्ती हरपली असल्याचे बोलले जात होते.दादा म्हणजे तरुणांचे आयडॉल म्हणून संबोधले जात होते.आज प्रचार करताना प्रत्येक कार्यकर्ते चेहऱ्यावर समाधानाचे भाव नव्हते.मात्र दादाच्या वारसा पुढे घेऊन जायचे असेल तर तुमच्या सहकाऱ्याने शक्य नाही अशी भावनिक आवाहन करण्यात आले.यावेळी प्रचाराची सर्व सूत्रे मराठा समाजाचे नेते उत्तम शेठ भोईर यांनी घेतली असून काहीही करून आपणांस हा गड जिंकावा लागेल असे आवाहन करण्यात आले.


            5 फेब्रुवारी होत असलेला मतदान ही आपण घेतलेली मेहनत आपल्याच साठी लाभदायक ठरणार आहे.आज अनेक पाणी,रस्ते,शिक्षण,नोकरी,रोजगार अश्या अनेक प्रश्नांना एकच उत्तर म्हणजे सावरोली जिल्हा परिषद निवडणुकीत उभे असलेले संतोष बैलमारे यांना भरघोष मतांनी निवडून येण्यासाठी आपण सहकार्य करावे दादाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी एकच उमेदवार संधी सर्वसामान्य मतदार राजानी त्यांस द्यावी त्या संधीचे सुवर्ण करण्याची जबादारी माझी असेल तसेच या प्रचार रॅलीचे नेतृत्व करीत उत्तम शेठ भोईर यांनी केले.शिस्त आणि संयम सांभाळून ही प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज