परिवर्तन विकास आघाडीला महिला वर्गास तरुण वर्गाचा पाठिंबा

 दिवसेंदिवस मतदार राजाचा प्रचारासाठी वाढता कल,परिवर्तन विकास आघाडीला महिला वर्गास तरुण वर्गाचा पाठिंबा 

माय मराठी न्युज : वृत्तसेवा                                             धामणी : 31 जानेवारी,




       जस जसे मतदानाचा दिवस समिप येत असताना प्रत्येक उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रीय होत असल्याचे पहावयास मिळत आहे.हाताच्या बोटावर माजेल  एवढेच दिवस शिल्लक असताना मतदार राजा पर्यंत आपली निशाणी पोहचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ते यांनी कंबर कसली आहे.मात्र परिवर्तन विकास आघाडी मध्ये मातपगार अशी मंडळी असून प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली आहे.यामध्ये विशेष योगदान जाते ते.मराठा समाजाचे नेते उत्तम शेठ भोईर, सुनिल थोरवे,राजेश पाटील,नरेश पाटील यांच्या खाद्यावर सध्या या प्रचाराची धुरा असल्याचे बोलले जाते.

          आज आपल्या गावाचा तालुक्याचा विकास हवा असेल तर परिवर्तन विकास आघाडी शिवाय पर्याय नाही.गरिबांचा जाण असलेला नेता तसेच कामगारांचा हितचिंतक व अष्टपेलू व्यक्तीमत्त्व म्हणून सावरोली जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे यांच्या कडे पाहिले जाते.कारण या परिसरातील कामगार वरती अन्याय झाल्यास जो पर्यंत न्याय मिळत नाही,तो पर्यंत ठाण मांडून  ठिय्या आंदोलन करणारा नेता म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते.यामुळे 7 फेब्रुवारी ला होत असलेल्या मतदान आपण त्यांना भारघोष मतांनी निवडून द्या,अशी भावनिक साद कार्यकर्ते घालत आहे.

          त्याच बरोबर पंचायत समिती सावरोली व वाशिवली गणामध्ये प्रमिला पाटीत,पूनम म्हात्रे या दोन्ही महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यास विजयी करून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.मात्र प्रत्येक मतदार यांनी जागृत राहून आपले मत घड्याळ आणि मशाल यांना देऊन प्रचंड बहू मताने निवडून देण्याची जबाबदारी सर्व सामान्य मतदार राज्यावर आहे.यामुळे कोणत्याही भावनिक अथवा धनशक्ती ला बळी न पडता विकास कामे करणाऱ्या व्यक्तीला मतदान करुन आपण त्यांच्या विजयाचे साक्षीदार बना असे आवाहन मराठा समाजाचे नेते व प्रचार प्रमुख उत्तम शेठ भोईर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज