राजिप शाळा तळवली येथे,केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

 राजिप शाळा तळवली येथे,केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न,

 मुख्याध्यापक मस्तान बोरगे यांचे आयोजन,

गट शिक्षण अधिकारी दीपा परब यांच्या हस्ते अनावरण 


 माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
तलवली : १० जानेवारी,

       विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा,तसेच त्यांनी तालुका जिल्हास्तरीय आपले कौशल्य दाखवले पाहिजे या उदात्त विचारातून राजिप शाळा तलवली येथे केंद्रीय स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुख्याध्यापक मस्तान बोरगे,सहशिक्षक सुरेश मांडे,शाळा व्यवस्थान समिती यांच्या माध्यमातून करण्यात आले.या या क्रीडा स्पर्धेचे अनावरण खालापूर तालुका गट शिक्षण अधिकारी दीपा परब यांच्या हस्ते करण्यात आले.
         केंद्रप्रमुख जे.पी.परदेशी यांच्या संकल्पनेतून क्रीडा स्पर्धा बरोबर चित्रातील रंगभरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नऊ शाळांनी सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळ कबड्डी, लंगडी, आणि वैयक्तिक खेळामध्ये धावणे, लिंबू चमचा, पोते उड्या, दोरीवरच्या उड्या, बेडूक उड्या इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत आपले कौशल्य दाखविलेल्या मुलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले 
       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिल्पा दास  मॅडम, रविंद्र रघुवंशी (युनिट हेड बिर्ला कार्बन )हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ज्ञानेश्वर मालकर, महादेव गडगे,सी.एम.मालकर,नागेश मालकर,कृष्णा बडेकर,अतुल मालकर,समीर मालकर,प्रभाकर वाघे यांचे सहकार्य लाभले.यावेळी शिक्षक सुभाष राठोड, भूषण पिंगळे, विकास शेळके, वैजनाथ जाधव, गणेश मुंढे, दीपक अकोलकर, रवी राठोड, मंगळ मुंढे,लता मोरे,मनिषा पाटील, संतोष गारगोटे रंजना वाघ, ज्योती फडतरे,अर्चना शेलार, मयुरी धायगुडे आणि पालक वर्ग मोठ्या संख्याने उपस्थित होते.

               ------------- चौकट --------- 

क्रीडा ही स्पर्धा राजिप शाळा तळवली येथे मुलांसाठी आयोजित करण्याचे मूल उद्देश की मुलांच्या मध्ये आत्मविश्वास वाढावा, त्याच बरोबर जिद्द  निर्णय घ्यायची क्षमता निर्माण व्हावी,जीवनातील शारीरिक कसरती बरोबर मनाने खंबीर पणे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते.असते.तसेच तालुका जिल्हा स्तरावरही त्यांना भविष्यात संधी उपलब्ध होऊ शकते.
     गटशिक्षणाधिकारी खालापूर दीपक परब



Post a Comment

0 Comments

 रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन