दत्तात्रय शेडगे : प्रतिनिधी
खोपोली : २५ मार्च,
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष खालापूर तालुका व खोपोली शहर यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शनिवारी निषेध करण्यात आला
2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या कर्नाटक मधील प्रचार दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या भल्याचे विधान करण्याऐवजी सर्व चोरांचे नाव मोदी कसे?अशी टीका भर सभेत केली होती. यांच्याविरोधात सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे अशा बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे पंतप्रधान मोदींसारख्या नेतृत्वाला जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा असून कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे त्या अंतर्गत शनिवारी खोपोली शहरात दिपक चौकात खालापूर तालुका व खोपोली शहर यांच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला
यावेळी भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे,शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, डॉ नागरगोजे,रामू पवार,हेमंत नांदे,सुनील नांदे,प्रमोद पिंगळे,सूर्यकांत भाई देशमुख माजी नगरसेवक, सौ सुप्रिया नांदे ओबीसी महिला जिल्हा कमिटी, रमेश रेटरेकर,अश्विनी अत्रे,रसिका शेटे,विमल गुप्ते,अजय इंगुळकर,डॉ निकेत पाटील,अपर्णा साठे,सुनीता पाटणकर ,शोभा काटे,कीर्ती ओसवाल, दिलीप पवार,गिरीश अभानी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments