अजय गायकवाड : प्रतिनिधी नेरळ - कर्जत , २२ मार्च , माथेरान घाटात प्रेमी युगलांच्या स्कुटीला अपघात घडला,दरम्याम ह्या अपघातात चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला,तर मागे बसलेली तरुणी ही पडून गंभीर जखमी झाली.विनय भोईर असे मयत तरुणाचे नाव समोर आले असून तो शहाड टिटवाळा येथील राहणारा असल्याचे सांगण्यात आलं.उतारावर स्कुटीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला असल्याचे प्रथम दर्शनी बोलले जात आहे,घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाली. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणारे माथेरान घाट फिरण्यासाठी दोन प्रेमीयुगल एकत्र स्कुटीवर आले होते,दरम्यान हे प्रेमीयुगल घाट फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटातील जुमापट्टी येथील वरच्या उतारावर या प्रेमीयुगलांच्या स्कुटीचे ब्रेक फेल झाले,दरम्यान ब्रेक फेल झाल्याने हे तरुण मदतीसाठी ओरडत देखील असल्याचे सांगण्यात आले होते मात्र पुढे एस टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उतारावर स्कुटी जावून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा रेलिंगला ठोकली,
हा अपघात एवढा भीषण होता की यात स्कुटीचे समोरील भाग पूर्णतः चेंबून गेला तर चालक विनय हा दूरवर दगडावर फेकला गेल्याने त्याचे डोके फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर डबल शीट बसलेली तरुणी ही मागेच रस्त्यावर पडल्याने तिच्या पायाला गंभीर जखम झाली होती.सदर घटनास्थळी नगरिकांनी एकाच गर्दी करीत नेरळ पोलिसांना माहिती दिल्याने घटनास्थळी नेरळ पोलीस हजर होत जखमी तरुणीला अधिक उपचारासाठी भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे हलविले होते, तर मयत विनयचा मृतदेह हा नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ठेवण्यात आल्यानंतर मयत विनयच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले होते.घटने बाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास नेरळ पोलीस करीत आहेत.
0 Comments