अजय गायकवाड : प्रतिनिधी नेरळ : २५ मार्च,
कळंब गरुड पाडा येथील विवाहित 53 वर्षीय महिला बेपत्ता झाली.मनीषा मंगळ ठाणगे असे बेपत्ता महिलेचे नाव समोर आले असून ती घरातून चार दिवस झाले निघून गेली ती परत आलीच नसल्याने महिलेच्या पतीने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
कर्जत तालुक्यातील कळंब पोस्ट हद्दीत येत असलेल्या गरुड पाडा येथील 53 वर्षीय मनीषा मंगळ ठाणगे ही महिला 21 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली होती.मतिमंद स्वभावाची असल्याने ती नेहमी प्रमाणे अशीच घराबाहेर न सांगता बाहेर जाते परंतु ती गेली तरी तिच्या भिवपुरी येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाते किंवा नेरळ येथे राहणाऱ्या तिच्या वृद्ध आई कडे जाते असे सांगण्यात आले,परंतु सदर महिला ही राहत्या घरातून निघून गेली ती कुठेच सापडून येत नसून चार दिवस झाले ती घरी देखील परतली नसल्याने अखेर पती मंगळ लक्ष्मण ठाणगे यांनी याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात पत्नी हरवली असल्याची माहिती दिली.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात आता महिला हरवल्या प्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बी.बी गर्जे हे करीत आहेत,सदर महिलेचा फोटो आता नेरळ पोलिसांकडून समोर आणला तर याबाबत महिलेची माहिती कोणाला मिळाल्यास नागरिकांनी नेरळ पोलिसांना माहिती द्या म्हणून सांगण्यात आले असून तसे आवाहन देखील करण्यात आले आहे.
0 Comments