दत्तात्रय शेडगे : प्रतिनिधी
खोपोली : २५ मार्च, मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर सायंकाळी साखरेच्या ट्रकला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे, मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुबंई कडे हा ट्रक साखर घेऊन जात असताना तो बोरघाटात आला असता त्याला अचानक आग लागली या आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून ट्रकचे आणि साखरेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, चालकाने तात्काळ ट्रक थांबवून उडी मारल्याने चालक बचावला आहे,
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य ,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, खोपोली फायर ब्रिगेड, आरटीओ टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाचला बोलावून आग विझवण्याचे प्रयत्न केले ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली,
0 Comments