दैवबलवत्तर आदिवासी महिला ट्रक अपघातात थोडक्यात बचावली.कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महमार्गावर ट्रकला घडला होता अपघात.

         


                                                                                अजय गायकवाड : प्रतिनिधी                               नेरळ : २५ मार्च, 

             कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महमार्गावर ट्रकला अपघात घडला,दरम्यान या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी येथील आदिवासी कुटूंब वाळकू ढोले व अलका ढोले थोडक्यात बचावले आहेत,हा ट्रक दुकांनाच्या झोपडीवर गेल्याने आदिवासी नागरिकांचे नुकसान झालं मात्र ट्रक चालक व त्याचा साथीदार हा जखमी झाला.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला,अपघातस्थळी कळंब पोलीस हजर झाली होती.


      गुरुवार 23 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महमार्गावर येत असलेल्या कळंब येथील चाहुची वाडी येथे मुरबाड कडून कर्जत दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचा वळणावर नियंत्रण सुटले होते,दरम्यान रस्त्याच्या काही अंतरावर असलेल्या आदिवासी वाळकू ढोले अलका ढोले या नागरिकांनी उदरनिर्वाहासाठी केलेली दुकानाची झोपडीवर हा ट्रक जाणार तेवढ्यात त्या दुकानात महिला  असल्याचे ट्रक चालकाला दिसली होती, चालकाने या महिलेला  वाचवण्यासाठी प्रयत्न केले ते यशस्वी देखील ठरले परंतु यात झोपडीचे नुकसान झाले आणि ट्रक बाजूला जाऊन पलटला,सदर चालकाला व त्याच्या साथीदाराला या अपघातात गंभीर दुखापत झाली,तर दैवबलवत्तर त्या आदिवासी महिला थोडक्यात बचावली आहे.ट्रकच्या वाहनाचा चाक हा महिलेच्या काही अंतरावरून निघून गेल्याचे त्यावेळी प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.तर वाळकू ढोले हे काही अंतरावे असल्याने ते बचावले,यावेळी घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस हजर झाली होती.तर जखमी चालकाला व त्याच्या साथीदाराला उपचारासाठी उल्हासनगर येथे नेल्याचे संगण्यात आलं,अधिक तपास कळंब पोलीस करीत आहेत.


       एकूणच या परिसरात आता पर्यत 15 ते 20 अपघात घडले असल्याचे येथील ग्रामस्थ सांगत असून वेगात येणाऱ्या वाहनाचे येथे वळणावर नियंत्रण सुटते आणि अपघात घडतात त्यामुळे येथे सूचना फलक किंवा गतिरोधक बसविण्यात यावे म्हणून आता मागणी पुढे येत आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण