पेण तालुक्यातील बारशेत धनगरवाडा आजही विकासापासून वंचित, पाणी आणि रस्त्याची आजही सुविधा नाही



दत्तात्रेय शेडगे : प्रतिनिधी                                              खोपोली : २३ मार्च,                                                      

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रोडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बारशेत धनगरवाडा येथील नागरिकांना आजही मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे, एकीकडे देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष उलटल्याने  मोठ्या धुमधडाक्यात  अमृतमहोत्सव साजरा केला परंतु पेन तालुक्यातील बारशेत येथील धनगर आणि आदिवासी समाज आजही विकासापासून लांबच आहे, पेण  शहरापासून 5 किमीच्या अंतरावर असलेल्या या गावात जायला आजही  पक्का रस्ता नाही, त्यामुळे येथील शाळेतील विद्यार्थी आणि कामगारांना पावसाळ्यात पायी प्रवास करावा लागतो                               तर पिण्याच्या पाण्याचीही सोया  नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी  लढावे लागत आहेत, ग्रामपंचायत आणि प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे, याबाबत धनगर समाजाचे युवा  नेते  विजय उघडे यांनी या वस्तीवर जाऊन येथील समस्या जाणून घेत या  नागरिकांच्या व्यथा शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयन्त करण्यात असल्याची ग्वाही उघडे यांनी ग्रामस्थांना दिली                                          तर येत्या काही दिवसांत प्रशासनाने आमच्या समस्याकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासामोर आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.यावेळी धनगर समाजाचे युवा नेते  विजय उघडे, संजय तिवले, राहुल कोकरे, देविदास ढेबे, ग्रामस्थ हरीचंद्र उघडे, दिलीप ढेबे, महेंद्र आखाडे, गंगाराम ढेबे, अंकुश ढेबे, गणेश उघडे, गंगाराम आखाडे आदी उपस्थित होते 




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर