जातीचे दाखले काढण्यासाठी उरण सामाजिक संस्था आणि परिवर्तन सामाजिक संस्था यांचा पुढाकार

 


पाताळगंगा न्यूज 
२४ मार्च,    

अदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळविण्यासाठी अनेक परिश्रम करावे लागत होते.मात्र उरण सामाजिक संस्था आणि परिवर्तन सामाजिक संस्था यांचा पुढाकार ते शक्य झाले.आणी रानसई आदिवासी वाडी खालापूर येथिल ग्राम पंचायत शिरवली येथे आदिवासी समाजातील लोकांचे जातीचे दाखले काढण्यासाठी उरण सामाजिक संस्था आणि परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
                यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी रायगड डॉ योगेश म्हसे , उप विभागीय अधिकारी अजित नैराले तहसीलदार खालापूर  अयुब तांबोळी, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली  त्या कॅम्प साठी सामाजिक कार्यकर्ते  महेश पाटील आणि प्रमिला पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. मंडळ अधिकारी कामत, तलाठी कावरखे तसेच सर्व तलाठी आणि त्यांच्या टीम ने उत्तम कामगिरी बजावली. 


          आदिवासी विकास निरीक्षक सोनवणे सर यांनी आदिवासी विकास प्रकल्प पेण तर्फे आदिवासी योजनांची माहिती दिली.. ह्या कॅम्प मध्ये जवळ जवळ १५०  फॉर्म्स भरून घेतले गेले. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी के आर पाटील, दत्ता शिरसाट, रोहित जाधव, नवश्या वाघमारे आणि सर्व आदिवासी बांधवांनी महसूल विभाग खालापूर यांचे विशेष आभार मानले. प्रा राजेंद्र मढवी आणि रत्नाकर घरत यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर