अवकाळी पावसामुळे वीट भट्टी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.प्रशासन अद्याप फिरकला नसल्याची खंत.

 


अजय गायकवाड : प्रतिनिधी                                        कर्जत / नेरळ : २३ मार्च ,                                                             कर्जत तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं,याला वीटभट्टी शेतकरी मालक देखील चुकले नाही परंतु वीट भट्टी मालक शासनाचा वेळोवेळी महसूल भरून ही शासनाला या वीट भट्टी मालकाची थोडीतरी कीव नाही का असा थेट प्रश्नच वीट भट्टी मालकांनी उपस्थित केला.तर महसूल गोळाकरणारे अधिकारी नुकसानग्रस्त वीट भट्टी धारक शेतकऱ्यांच्या जागेवर देखील पोहचले नसल्याने नाराजी व्यक्त केली.

             राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं.काही ठिकाणी अद्याप शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रशासन शेकऱ्यांपर्यत पोहचलेला दिसत नाही म्हणूनच शेतकरी आपली व्यथा प्रसार माध्यमातून मांडताना दिसतो,रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुल्याला गेल्या काही दिवस सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते,काही ठिकाणी तर बर्फाचा देखील पाऊस कोसळला.याच गार पीठाने शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचे तर शेतात लावलेल्या कडधान्य पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले.मात्र केवळ आंबा पीक,तर शेतात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं नाही तर वीट भट्टीचा व्यवसाय करणारे शेतकरी मालक देखील या अवकाळी पावसाला चुकले नाही.तालुक्यातील अनेक वीट भट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान या अवकाळी पावसाने केलं परंतु अद्याप कुठलाही वीट भट्टी मालक आपली व्यथा मांडण्यासाठी समोर आलेला नाही, पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील  तळवडा येथील विट भट्टी शेतकरी मालक रोहिदास माळी  यांनी मात्र याला वाचा फोडण्याचे काम केले आहे,तर कायम आम्ही प्रशासनाचा महसूल हा न चुकता वेळेवर भरत आलो,आज आमच्यावर एवढे मोठे संकट ओढवले तरी या महसूल विभागाला शेतकऱ्यांची थोडी सुद्धा किंव आली नाही,अजून प्रयत्न कुठला महसूल अधिकारी कर्मचारी आमच्याकडे साधा फिरकला सुद्धा नाही म्हणून खंत बोलावून दाखवली.



     थापून ठेवलेल्या विटा पाण्याने भिजून माती माती झाली,वीट वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक देखील हांतरले परंतु अचानक आलेल्या या पावसाने कामगारांची तारांबळ उडाल्याने जेवढं शक्य झालं तेवढे माल वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे,मात्र खराब झालेला माल हा पुन्हा मातीत टाकण्यात आल्याची वेळ या शेतकऱ्यावर आली,मोल मजुरी करणाऱ्या कामगारांचे मजुरी देखील देणे आहे,लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना प्रशासनाला आमच्याकडे पाहायला वेळ नसल्याने,आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाला महसूल न भरण्याचाच इशारा दिला.



           एकूणच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वीट भट्टीमालक शेतीला जोड व्यवसाय म्हणून व्यवसाय करीत आहेत,काही मालक प्रशासनाचा महसूल डोळ्यात धूळ घालून बुडवत देखील असतील परंतु जे नियमित महसूल भरतात त्यांचं काय?अवकाळी पावसाने सर्वच हतबल झालेत.प्रशासनाला शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नाही,प्रशासनाकडून फार काही मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना देखील नाही परंतु एकदा तरी आपल्या शेताच्या बांधावर प्रशासनाने शेतकऱ्यांची विचार पूस करायला यायला हवे म्हणून वाटत असते.म्हणून आता तरी प्रशासन या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार का? त्यांच्या व्यथा ऐकणार का?हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर