गुरांच्या वरती आली डबक्यातील पाणी पिण्यांची वेळ



पाताळगंगा न्यूज  : २४  मार्च,कोकणात पूर्वी मुबलक चारा  पाणी मोठ्या प्रमाणात असायचे,मात्र पावसाळा संपताच या जलाशयाने आपली पाठ फिरवत असल्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी चिंतेने ग्रासले आहे.मात्र अजूनही तीन  महिने बाकी असताना,मात्र जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने डोंगराच्या कडी -कपारीतून साचलेले पाणी याच पाण्यावर मेंढ्या आणि गुरे आपली तृष्णा शांत करीत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.तर काही ठिकाणी गुरे डबक्यातील पाणी असल्यामुळे त्याच्या  आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे.
          आदिवासी ,शेतकरी त्याच्याकडे शेतीच्या कामांसाठी बैल, गाय, म्हैस हे पशुधन असतेच. हे पशुधन सांभाळण्यासाठी शेतकरी मोठे कष्ट घेतात. त्यांच्या चारा- पाण्याची सोय करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात;मात्र जंगलात उगवले चारा वणव्याने जळून खाक होत असल्याने तसेच ,पाण्यांचा तुटवडा निर्माण होत असल्यांने यापुढे जनावरे सांभाळावी कशी असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.दुधाळ जनावरांना हिरव्या चार्‍यांची जास्त प्रमाणात गरज असते.यामुळे दुग्ध उत्पादनातही घट होण्याची शक्यता शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.परंतू चारा विकत तरी कोठून घ्यायचा, हा सुद्धा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे.
           दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालली आहे.अशा वेळी छोटे -छोटे सरोवर तळ गाठण्यास सुरुवात झाली आहे.यामुळे त्यांच्या  पिण्याच्या पाण्याची सोय कशी करावी ही समस्या डोके वर काढत आहे.गुरे ही जगली पाहिजे या साठी शुद्ध पाणी चाराही महत्वाचा आहे.मात्र तो कोठून घ्यावयाचे असे अनेक विचारामुळे शेतक-याला मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.फेब्रुवारी महिना संपताच मार्च महिना त्यातच रणरणत्या उन्हाची झळ यामुळे शेतकरी पुरता हैराण झाले आहेत.अशा सर्वं समस्या पशुधन पाळणा-यांना जाणवू लागले आहे.

फोटो कॅप्शन  :  डपक्यात राहिलेले पाणी पिऊन तृष्णा शांत करीत असतांना ही गुरे ( छाया : काशिनाथ जाधव ,पाताळगंगा)

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर