दत्तात्रय शेडगे : प्रतिनिधी
खोपोली : २३ मार्च, सह्याद्रीच्या कुशीत घाटमाथ्यावर असलेल्या ग्रामस्थ मंडळ गारमाळ आयोजीत दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह सोहळा नुकताच सपन्न झाला,
गुडीपाडवा आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून सप्ताह सोहळा मंगळवार आणि बुधवार मार्च रोजी पार पडला, मंगळवारी सायंकाळी या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी, ह भ प अनंत महाराज आळंदे यांचे प्रवचन झाले , नंतर हरिपाठ, ह भ प श्रीहरी महाराज नागरगोजे यांचे हरिकीर्तन, भजनी मंडळ गारमाळ यांचे भजन झाले
बुधवारी रोजी पहाटे 4 वाजता काकड आरती, कळस प्रदक्षिणा, ह भ प सुरेश महाराज आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन, तर सायंकाळी शिवशाहीर वैभव घरत यांच्या मराठममोळा पोवाडा आणि गीतांचा कार्यक्रम करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी जिल्हापरिषद सदस्य नरेश पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, चावणीचे सरपंच बाळासाहेब आखाडे, उपसरपंच सुखदेव भोसले, सदस्या संगीता संदीप चिंचावडे, ग्रामस्थ विष्णू चिंचावडे, गणपत चिंचावडे नारायण चिंचावडे, गबलू भोसले,मारुती फाटक, संदीप चिंचावडे, सोमनाथ चिंचावडे, सुभाष भोसले, नामदेव वाघमारे, सटू कोंडभर, लक्ष्मण कोंडभर, नवनाथ चिंचावडे, रामदास चिंचावडे, मंगेश फाटक, तुकाराम आखाडे, प्रकाश आखाडे, दत्ता आखाडे, बाळू शेडगे,महेंद्र तुपे, शैलेश तुपे, सुभाष तिकोने, संदीप तिकोने, पांडुरंग ज.जानगले, एकनाथ कोंडभर, हरिभाऊ कोंडभर, चंद्रकांत कोंडभर, गणपत कोंडभर, संजय चिंचावडे,आदींसह अनेक ग्रामस्थ आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments