बोरघाटाला शिंग्रोबा धनगर नाव द्या - आमदार महादेव जानकर यांची विधानसभेत मागणी



दतात्रय शेडगे : प्रतिनिधी                                खोपोली : २५ मार्च,

          मुबंई पुणे जुन्या महामार्गवर असलेल्या बोरघाटाला वीर हुतात्मा शिंग्रोबा  धनगर हे नाव द्या अशी मागणी  माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांनी विधानसभेत केली, 


            देशावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा इंग्रज मुबंई पुणे जोडण्यासाठी रस्ता काढायला कसा याचा विचार करून ते खोपोली जवळील डोंगरात भटकत होते त्यावेळी तेथे मेंढ्या चारत असलेल्या  शिंग्रोबा  धनगराने पाहिले व त्यांनी इंग्रजांना विचारले की काय इकडे तिकडे शोधताय ? त्यावेळी इंग्रज बोलले की आम्हाला या डोंगरातून रस्ता काढायचा आहे मात्र तो काढायचा कसा हेच कळत नाही  त्यावेळी शिंग्रोबा बोलले की मी तुम्हाला रस्ता दाखवतो तुम्ही माझ्या मागे या त्यावेळी शिंग्रोबा पुढे त्यामुळे मेंढ्या आणि त्यामागे इंग्रज असा करत इंग्रज घाट चढुन वरती आले                                                                                  आपण येथून रस्ता काढू त्यावेळी इंग्रजांनी शिंग्रोबाला विचारले की तुम्ही रस्ता दाखवल्याबदल इनाम म्हणून माग काहीतरी त्यावेळी शिंग्रोबा धनगर बोलले की मी धनाने धनगर आहे मला काही द्यायचे असेल तर आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या स्वातंत्र्य द्या हे शब्द इंग्रजांच्या कानावर पडताच त्या क्रूर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शिंग्रोबाला गोळ्या घालून ठार मारले, व त्या ठिकाणी इंग्रजांनी रस्ता तयार करून मुबंई पुणे एकमेकांना जोडले गेले ,तो आजचा बोरघाट 
          ज्या शिंग्रोबा धनगराला गोळ्या घातल्या त्याठिकाणी वीर हुतात्मा शिंग्रोवाचे मंदिर बांधले असून आजही प्रत्येक वाहन त्याठिकानाहून जातात क्षणभर शिंग्रोबा मंदीराजवळ वाहन थांबवून शिंग्रोबाला नमन करूनच पुढे जातो त्या  महान वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगराचे नाव हे बोरघाटाला द्यावे अशी मागणी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत केली 
 मात्र आता या याकडे सरकार किती गांभीर्याने घेऊन पूर्तता करते याकडे साऱ्या  महाराष्ट्रातील धनगर समाजाचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर