दत्तात्रय शेडगे : प्रतिनिधी
खोपोली : २५ मार्च,
गारमाळ येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे येथील ग्रामस्थांना रोजच नाहक त्रास सहन करावा लागत असून रोजच खड्यातून प्रवास करावा लागत आहे, दस्तुरी ते गारमाळ हा 5 किमी रस्ता असून या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 1 कोटी 6 लाख रुपये मंजूर केले आहेत मात्र तरीही ठेकेदार या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून रस्त्याचे काम करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे,
गारमाळ, वाघरनवाडी गवळीवाडा येथील ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी येत्या 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगड यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे, येथे गारमाळ,वाघरनवाडी, गवळीवाडा आणि धनगरवाडा अशी चार गावे असून येथे 500पेक्षा जास्त लोकसंख्या आहे,
येथिल नागरिकांना उदरनिर्वाहाचे कुठले साधन नसल्याने येथील ग्रामस्थांना आणि शाळेतील लहान मुलांना लोणावळा खोपोली कडे रोज ये जा करावे लागत आहेत, त्यामुळे येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून खडी रस्त्यावर आली आहे, त्यामुळे दुचाकीस्वार खडीवरून घसरून अपघात होण्याची दाट शक्यता असून , एखादा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हा ठेकेदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे
प्रतिक्रिया-
आमच्या रस्त्यावर नेहमीच ग्रामस्थांची ये जा चालू असते मात्र आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,याला फक्त ठेकेदार जबाबदार असून त्यांच्या विरोधात आम्ही 5 एप्रिलला महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा चावनीचे सरपंच बाळासाहेब आखाडे आणि उपसरपंच सुखदेव भोसले यांनी दिला आहे
0 Comments