भास्करभाई कारे यांची कुणबी तालुका सरचिटणीस पदी निवड

 


कृष्णा भोसले : प्रतिनिधी
तळा : २८ मार्च,

         तळा तालुक्यातील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिकआश्या विविध माध्यमातून आपली पकड मजबूत असलेले आणी प्रत्येकांच्या सुख : दुखात सहभागी असणारे व्यक्तीमत्व म्हणजे भास्करभाई कारे त्यांच्या कडे माणुसकीचा झरा सातत्याने वाहत असून आपल्या शब्दातून प्रत्येकाला आपलेसे करीत असून नुकताच मुंबई येथे झालेल्या सभेमध्ये कुणबी राजकीय संघटनेच्या तळा तालुका सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलेला पाहावयास मिळाले.
                   भास्करभाई कारे हे स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेचे संस्थापक असून ते  कुणबी युवाचे माजी उपाध्यक्ष पद त्यांच्या जवळ आहे.शिवाय ते कुणबी ब्रिगेड चे ते सल्लागार असुन कुशल संघटक म्हणून त्यांचेकडे पाहीले जात आहे. या मिळालेल्या पदाचा उपयोग ते समाज्यामध्ये होत 
समाजातील होत असलेल्या अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी तसेच दिन दुबळ्यांची सेवा करण्यासाठी त्यांचा या पदाचा वापर केला जाईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
           त्याच बरोबर समाज्यात पिडीत, सुशिक्षित, बेरोजगार तरुणांनाच्या समस्याकडे लक्ष देऊन,त्यांच्यासाठी रोजगार कसे उपलब्ध होइल याकडे जास्तीत जास्त लक्ष घालून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यांचे काम माझ्यामाध्यमातून करण्यात येइल.त्यांची सरचिटणीस पदि नियुक्ती झाल्यांचे कळताच या विविध  राजकीय,सामाजिकआश्या विविध माध्यमातून कामे करीत असलेल्या त्यांच्या निवास स्थांनी जावून त्यांस पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर