ह.भ.प. रमेश महाराज पाटील यांना मातृशोक

 



पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा
३१ मार्च,         
        खालापूर तालुक्यातील  आंबिवली गावात राहणारे ह.भ.प.वैकुंठवासी रखुमाबाई वामन पाटील हिचे अल्पशा आजाराने  दि.२८ मार्च  रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.ते वयाच्या ७६  वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                                            त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने  कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.                                                                  ह.भ.प. रमेश महाराज पाटील  यांचे वडील वैकुंठवासी ह.भ.प. वामन महाराज पाटील कीर्तनकार तसेच प्रवचनकार म्हणून नावलौकिक होते.सोंगे भारूड म्हणून त्यांचे नाव या तालुक्यात उज्ज्वल केले होते.अश्या घराण्यात अखंड वारकरी संप्रदाय झरा वाहत आहे.आज वैकुंठवासी ह.भ.प. वामन महाराज पाटील,ह.भ.प  वैकुंठवासी रखुमाबाई वामन पाटील दोन्ही व्यक्ती अस्तित्वात नाही.मात्र त्यांनी केलेले कार्य दिव्याप्रमाणे तेज्योमय भासत आहे.                                              त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी ६ एप्रिल रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगांव तर उत्तरकार्य  सोमवार दिनांक १० एप्रिल  रोजी  ,आंबिवली (माजगांव) त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.रामदास महाराज पाटील खोपोली( गुरुकुल संस्था महड ) यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा ह.भ.प. रमेश महाराज पाटील,श्रीराम वामन पाटील,तसेच सुनिल बाळाराम पाटील, भाऊ बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.








Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर