स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांची आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे बैठक संपन्न

 


दिपक जगताप : प्रतिनिधी
खालापूर : १ एप्रिल
         महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-खालापूर विधानसभेचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत येथे भारतीय जनता पार्टी व शिवसेना कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली
 *स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा* या उपक्रमाचे दिनांक ४  व ५ एप्रिल २०२३  या कालावधीत आयोजन केले आहे .
                 ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४  वाजता नेरळ येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  शोभ यात्रा होणार असून त्याची सांगता कर्जत येथे होणार आहे तर दि ५  एप्रिल रोजी खोपोली फाटा येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शोभयात्रा निघणार असून खोपोली गावात त्याची सांगता होणार आहे सदर यात्रेच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरभी हाॅल पोसरी येथे घेण्यात आली.


                   यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे,जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर,विठ्ठल मोरे,विजय पाटील ,भाई गायकर,तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर भाजपा, तालुका अध्यक्ष संदेश पाटील शिवसेना,पंकज पाटील,गोविंद बैलमारे,रमेश मुंढे,सुनील गोगटे,राजेश कराले,राजेश भगत,इंदरमल खंडेलवाल,संभाजी जगताप,शिवराम बदे,सुनील रसाळ ,दिलीप ताम्हने,श्रेया गोगटे,सुजाता दळवी,रसिका शेटे,निलमताई चोरगे,सुरेखा खेडकर,रोषणा मोडवे,रेश्मा आंग्रे,संध्या जाधव यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर