अजय गायकवाड : प्रतिनिधी नेरळ - कर्जत ,२२ मार्च, नववर्ष स्वागत यात्रा समिती नेरळ यांच्या वतीने आज गुढीपाडवा सणा निमित्ताने नेरळ शहरात भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते,दरम्यान या शोभायात्रेला दरवर्षीप्रमाणे परंपरेचा मराठमोळा बाज सारखाच असला तरी यंदा या परंपरेला विचारांचीही जोड दिलेली दिसली. सण साजरे करतानाच त्याद्वारे सामाजिक कार्यासह अनेकविध विषयांवर होणारे जनप्रबोधन हे यंदाच्या शोभायात्रेचे मुख्य वैशिष्ट्य दिसून आले.
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा,हिंदू नववर्ष,या गुढीपाडवाच्या सणानिमित्याने शहरात ठिकठिकाणी आरोग्यगुढी उभारण्यात आली होती. सकाळी सर्वप्रथम गुढीचं पारंपारिक पूजन करण्यात आल्यानंतर समितीकडून भव्य शोभायात्रेला नेरळ चिंचआळी येथील दत्त मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या या भव्य शोभा यात्रेत ट्रेडीशनल कपडे घालून नटून सजून तरुणाई सहभागी झाली होती.घोड्यांवर विराजमान झालेले छोटे मावळे शोभा यात्रेत उठून दिसत होते,प्रजापती ब्राम्हकुमारी येथील महिला तर वारकरी संप्रदायाचे मंडळींनिही शोभा यात्रेत आपला सहभाग नोंदविला होता.श्रीराम,लक्ष्मण,शिता, तर लक्ष्मी,श्री गणेश,साईबाबा पालखीचे ग्रामस्थ दर्शन घेत होते.
शहरांमध्ये पारंपरिक शोभायात्रांना विविध सामाजिक संकल्पनांची चौकट असल्याने सण आणि प्रबोधन असा मेळ यंदा साधला गेल्याने यामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छ शहर कसे ठेवता येल याची जनजागृती या माध्यमातून करण्यात आली होती.मूख्य बाजारपेठ ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ब्राह्मण आळी ते राम मंदिर असे या शोभायात्रेचे समितीकडून नियोजन करण्यात आले होते.
0 Comments