संत श्री बाळूमामा देवाचा उत्सवाचे आयोजन ,पांगोळी धनगरवस्ती येथे होणार भव्य उत्सव

 


दत्तात्रय शेडगे : प्रतिनिधी
पाताळगंगा : २८ मार्च, 

       अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळूमामा देवाच्या उत्सवाचे आयोजन  करण्यात आले असून हा उत्सव गुरुवार  ६ एप्रिल २०२३  रोजी पांगोळी धनगरवस्ती (लोणावळा) येथे होणार असल्यांचे समजते.
      यावेळी सकाळी ६ वाजता श्रींचा अभिषेक, ७;३० वाजता आरती, ९  वाजता सत्यनारायण महापूजा, २  वाजता होमहवन, ४:३० ते ८;३०  श्रींची भव्य मिरवणूक, ७;३०  ते ९:३० महाप्रसाद, ९;३० ते ११;३०  कर्मवीर ह भ प भगवान महाराज कोकरे यांचे कीर्तन होईल 
           तरी या उत्सवाला महाराष्ट्रातील  सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  संत श्री बाळू मामा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त तथा माजी सरपंच बबन खरात यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर