" बैलगाडा शर्यतीला " खांडपे मैदानावर " न भूतो , न भविष्यती " अभूतपूर्व गर्दी ! राजिपचे मा. उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे यांचा " नाद " नाही........


सुभाष सोनावणे - प्रतिनिधी                                     भिसेगाव- कर्जत : २३ मार्च , कर्जत तालुक्याच्या इतिहासात बैलगाडा शर्यतीत भाग घेणारे व ते पहाणारे यांची अभूतपूर्व गर्दी आज खांडपे येथे पाहण्यास मिळाली .कर्जत शहारापासूनच या अलोट गर्दीला आज सकाळपासूनच सुरुवात झाली . राजिपचे मा . उपाध्यक्ष तथा शिक्षण - क्रीडा - आरोग्य सभापती व कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकरशेठ घारे यांनी आयोजन केलेल्या आज दि.१९ मार्च २०२३ रोजी " बैलगाडा शर्यती " पाहण्यास मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती प्रेमी यांनी हजेरी लावली . 



       महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग असलेल्या व या मराठमोळ्या मातीत जन्माला आलेल्या " बैलगाडा शर्यतीला "  न्यायालयाने बंदी उठवल्यावर खेळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे . या खेळाला सुवर्ण झालर लावून ती संस्कृती जोपासण्यासाठी सुधाकरशेठ घारे यांनी आयोजन केले असून कर्जत तालुक्यातील इतिहासात प्रथमच " भव्य बैलगाडा शर्यत " शासनाच्या नियमानुसार मैदानाची आखणी करून या शर्यती होत आहेत . रायगड , ठाणे , पुणे , नवी मुंबई येथून बैलजोडी व छकडे घेऊन बैलगाडा शर्यती मालक कर्जत तालुक्यातील आकुरले , तमनाथ ,शिरशे ,अवळस ,नेवाली ,मोहिली , बीड ,कोंदिवडे , खांडपे , तिवणे , येथे वस्ती करून रहायला आले होते , तर दिवसभरातूनही अनेक बैलगाडा शर्यती मालक व ते बघण्यास शर्यती प्रेमी हजारोंच्या संख्येने दोन चाकी ,चार चाकी वाहनांवरून या मैदानी खेळाच्या इतिहासात साक्षीदार होण्यासाठी जात असतानाचे चित्र येथे पाहण्यास  मिळत होते. 



          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष तथा शिक्षण - आरोग्य - क्रिडा सभापती सुधाकरशेठ घारे यांनी रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कर्जत तालुक्यातील खांडपे येथील बैलगाडा शर्यतीच्या भव्य मैदानावर आयोजित केले आहेत .यावेळी उसळलेल्या गर्दीचे चित्र पाहता " सुधाकरशेठ घारे " नाद नाही तुमचा , अश्या प्रतिक्रिया सर्व शर्यती प्रेमी व कर्जत तालुक्यातील नागरिक देत होते . दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे , खासदार अमोल कोल्हे , माजी पालकमंत्री तथा आमदार अदितीताई तटकरे , कर्जत - खालापूरचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड , मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके , आमदार अनिकेतभाई तटकरे , यांचे आगमन व सत्कार समारंभ होणार असल्याने कर्जत - खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . 

         या अभूतपूर्व गर्दीने येथील राजकीय भवितव्यावर देखील याचे पडसाद उमटणार असल्याने आजची "  बैलगाडा शर्यती " राजकारणात देखील " भूकंप " आणणार , हि काळ्या दगडावरची रेघ म्हणावी लागणार ,असेच काहीसे चित्र येथे पाहण्यास मिळत आहे .

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर