खोपोलीत मुक्या प्राणीपक्षांची तहान भागविण्यासाठी फ्री वॉटर बाऊल वितरण संपन्न

 


दत्ता शेडगे : प्रतिनिधी                                                         खोपोली : २३ मार्च, उन्हाचा पारा चढल्याने अंगाची लाही लाही होते, उष्माघाताने मृत्यू देखील ओढावतो यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण पाणी पितो मात्र मुक्या प्राण्यापक्षांना तहान भागवणे अत्यंत कष्टाचे होते, ही बाब लक्षात घेऊन श्री कृपा एक्वेरियम - खोपोली आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने  लोणावळा येथील तुषार जैन यांच्या 'वॉटर फॉर व्हॉईसलेस' फोरमच्या माध्यमातून फ्री वॉटर बाऊल उपलब्ध करून घेत त्याची ऑनलाईन नोंद करून प्राणीमित्रांना भेट म्हणून दिले.                                                                                   गुढीपाडव्याचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना प्रवीण शेंद्रे आणि गुरुनाथ साठेलकर  यांच्या  संकल्पनेतून मुक्या प्राणी पक्षांची तहान भागवण्यासाठी फ्री वॉटर बाऊलची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली गेली. प्राणी मित्र नवीन मोरे, शिल्पा मोदी आणि वर्षा मोरे यांच्या हस्ते खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील प्राणी मित्रांना फ्री बाऊलचे वितरण करण्यात आले.



गुढीपाडवा हा सण निसर्गाच्या बदलांचा आनंदाने स्वीकार करणारा असतो मात्र त्या आनंदात मुक्या प्राणी पक्षांना समावून घेण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आशय या निमित्ताने आयोजकांकडून स्पष्ट केला गेला. या वितरण प्रसंगी प्रगती बट्टेवार, अमोल कदम, निलेश कुदळे, जगदीश मरागजे, श्रद्धा  साठेलकर, भक्ती साठेलकर, दीपिका नागरगोजे, शैलेश मांडवकर इत्यादी प्राणी मित्र उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर