रंगोत्सव सेलिब्रेशनच्या प्रतियोगितेत वसंत देशमुख मेमोरियल स्कुलला अभुतपुर्व यश.

 


गुरुनाथ साठीलकर : प्रतिनिधी
खोपोली : १ एप्रिल,
      
                 रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन या प्रतियोगितेत आंतरराष्ट्रीय पातळीवर खोपोलीच्या वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड जूनियर कॉलेज ऑफ सायन्स / आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल ते बक्षीस पात्र ठरले आहेत.  या प्रतियोगितेत अनिकेत शेकापूरकर अंशिका चौरसिया यांना स्पेक्ट्याक्युलर परफॉर्मन्स अवार्ड देण्यात आले. मानवी नेगी, प्रभात मिश्रा आणि उपासना निकम यांचा इमार्जिंग युथ आर्टिस्ट अवॉर्ड (मेडल) देऊन सन्मान करण्यात आला तर निखिल मंडळ आणि निहारिका विश्वास यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. 


               रंगोत्सव सेलिब्रेशन इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष उल्हास देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष विक्रांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी तेजस्वी देशमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सीमा नाईक, प्राथमिक व उच्च प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी वाघुले यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक अजय जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.  या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.






Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर