जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत दादा ठाकुर व आमदार महेश बालदि यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
दीपक जगताप : प्रतिनिधी
खालापूर : २ एप्रिल ,
उरण मतदार संघातील चौक विभागातील सुधीर ठोंबरे व प्रवीण मोरे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने भाजपला नवसंजीवनी मिळाली असून आमदार महेश बालदि हे त्यांनी दिलेला शब्द पाळत आहेत जनतेची सेवा करणं हेच आपल पहिल कर्तव्य समजून उरण मतदार संघात आज जवळपास पंचवीस कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले
लोधीवली गाव ते हायवे रस्त्या पर्यंत रस्ता करणे एक कोटी लक्ष निधी,तुपगाव स्मशानभूमी रस्ता करणे पंचवीस लक्ष निधी,जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे तुपगाव येथे दोन कोटी पन्नास लक्ष निधी,हातणोली गणेश घाट रस्ता करणे एक कोटी पन्नास लक्ष निधी,कलोते येथे रस्ता व पूल बांधणे एक कोटी निधी,ताडवाडी व इतर वाड्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना करणे एक कोटी पंच्याशी लक्ष निधी, काटवन येथे रस्ता करणे दोन कोटी पन्नास लक्ष निधी,निगडपट्टी रस्ता करणे पन्नास लक्ष निधी,आंबेवाडी रस्ता करणे पन्नास लक्ष निधी ह्या विवीध कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.
,रसायनी विभाग व चौक येथून चारशेहुन अधिक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ह्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत दादा ठाकूर, उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदि,माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे,जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे ,तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे,तालुका सरचिटणीस प्रवीण मोरे, सरपंच रितू ठोंबरे , प्रितेश मोरे सरपंच, रवी कुंभार सरपंच,सुहास कदम सरपंच,सुयोग भालेकर उपसरपंच ,निखिल पाटील सदस्य ,सुशीला भुईकोट सदस्या, मंगल वाघमारे सदस्या, बळीराम ठोंबरे सदस्य,बेबी जाधव सदस्या, बंडू गुरव,नंदू सोनावणे, प्रवीण जांभळे,गणेश कदम,ज्योती धारने सदस्या, रेश्मा ठोंबरे,नागेश ठोंबरे, मंगेश ठोंबरे,यशवंत पाटील,प्रभाकर सांगळे, धनाजी भुईकोट,भगवान पार्टे,मंगेश भुईकोट,प्रणित सांगळे,पायल सांगळे,कविता भुईकोट यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments