भर नागरीवस्तीत ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दोन ट्रे घेवून चोर फरार.नेरळ शहरात चोरांचा सुळसुळाट सुरू

 


अजय गायकवाड                                                             नेरळ / कर्जत ११ एप्रिल

              नेरळ परिसरामध्ये पुन्हा एकदा चोरीच्या घटनां वाढू लागल्याचे चित्र समोर येत आहेत.नुकतेच खांडा येथे सोनसाखळी चोरांनी एका महिलेच्या गळ्यातील भर नागरी वस्तीत चोरी केली होती तर आता बाजारपेठेत किराणा दुकानासह ज्वेलर्सचे दुकान चोरांकडून लुटण्यात आले आहेत,दरम्यान हा सर्वप्रकार cctv कॅमेरात कैद झाला.सोनार दुकानातून चोराने दोन ट्रेच समोर चोरून नेल्याने मात्र खळबळ उडाली.

           नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ मुख्य  बाजारपेठ येथील 10 एप्रिल रोजी भर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने नाकोडा ज्वेलर्स येथील दुकानात चोरी केली.दुकान मालक काही सेंकदासाठी दुकानातून बाजूला गेला असता चोराने ज्वेलर्सच्या दुकानातील दर्शनी भागात लावलेल्या काचेच्या आत मधील दोन ट्रे चोरून नेलेत यामध्ये ऐकून आठ नऊ तोळे सोने असल्याचे बोलले जात आहे.एकूणच सात ते आठ लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी ही चोराने काही सेंकदात दुकान मालकाला कळण्याच्या आधीच चोर पळून फरार झाला.दरम्यान यावेळी मालकाने चोराचा पाठलाग देखील केला परंतु चोर पळून जाण्यास यशस्वी ठरला.

       एकूणच भर नागरी वस्तीत आणि दिवसा ढवळ्या चोर चोरी करू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.काही दिवसा पूर्वी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नेरळ खांडा येथे बसची वाट पाहत बसलेल्या महिलेची गंठण मोटारसायकलवर आलेल्या चोरांनी पळवली होती.तेव्हा ही परिसरात नागरिकांची वर्दळ असताना ही घटना घडली,तर नेरळ शहरातील प्रसिध्द किराणा मालाचे व्यापारी महेश कटारिया यांच्या देखील किराणा दुकानात गेल्या काही दिवसात दोन ते तीन वेळा चोरी झाल्याचे समोर आलं.दरम्यान चोरी करणारा चोर cctv कॅमेरात कैद झाला.

       एकूणच भर नागरी वस्तीत आणि दिवसा ढवळ्या चोरांनी आपला उच्छाद मांडला असून नेरळ पोलीस या चोरांचा बंदोबस्त कसा करणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,