भगवान महावीर जयंतीनिमित्ताने जैन समाजाकडून शोभा यात्रा,शोभा यात्रेत अहिंसा व समभावाचा संदेश

 


अजय गायकवाड  : प्रतिनिधी                                 नेरळ / कर्जत ४ एपिल,

             नेरळ शहरात आज मोठ्या उत्साहात जैन समाजाकडून भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे,दरम्यान आज महावीर जयंतीचे औचित्य साधून शहरात भव्यदिव्य अशी शोभा यात्रेचे नियोजन देखील करण्यात आले होते.अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीर असा जयघोष करीत ढोल पथकाच्या गजरात शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती,यावेळी शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण येथील चित्र रथावर आरूढ असलेली भगवान महावीर यांची ध्यानस्थ प्रतिमा तर बच्चेकंपनी यांनी केलेला पेहराव हे नागरिकांना अहिंसा व समभावाचा संदेश देत होती.

           4 एप्रिल भगवान महावीर यांच्या जयंत्ती निमित्ताने आज नेरळ शहराच्या जुन्या बाजारपेठ येथील जैन मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती,या शोभा यात्रेत जैन तरुण तरुणी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,ढोलताशांच्या गजरात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता तर ढोलाच्या तालावर तरुणासोबत जेष्ठ नागरिक चिमुरड्यानी ताल धरला होता.



        दरम्यान या जैन शोभा यात्रेत नेरळ शहरातील विविध समाजाच्या नगरिकांनी देखील आपली उपस्थिती लावली होती,ठिकठिकाणी या शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले तर भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.जैन समाजाचे सोनल जैन यांनी स्वर्गीय मियाचंदजी परिवाराकडून नगरिकना पुरी भाजी,गोड लाडू वाटण्यात आला होता.



शांततेत निघालेल्या या शोभा यात्रेत नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे स्वतः आपल्या नेरळ पोलीस सहकारी यंत्रणे सोबत उपस्थितीत राहत शहरात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून उपाययोजना करताना दिसले तर निघालेल्या शोभा यात्रेला मोकळी वाट करीत होते.

    शांतता ,शिस्तबद्ध आणि जल्लोषात निघालेल्या या शोभा यात्रेचे जैन मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य बाजारपेठ कडून अंबिकानाका मारुती मंदिर ते जैन मंदिर अशी शोभा यात्रेचे यावेळी नियोजन केले होते.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार