अजय गायकवाड नेरळ / कर्जत : १३ एप्रिल,
कर्जत श्रीराम पुलावर एका तरुणाचा डंपर खाली येवून जागीच मृत्यू झाला,तेजास उर्फ बंटी भगवान भोईर असे या मृत तरुणाचे नाव समोर आले असून तो तमनाथ येथील राहणारा असल्याचे सांगण्यात आलं.घटनास्थळी कर्जत पोलीस हजार झाली आहे
कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे राहणारा तेजास भोईर हा आपल्या मोटारसायकल वरून घरी निघाला होता,दरम्यान कर्जत नगरपालिका हद्दीतील श्रीराम पुला जवळ तेजास हा आपल्या मोटारसायकल वरून जात असताना त्यांची बाईक कशाला तरी धडकून रस्त्यावर पडली असता मागून येणाऱ्या डंपर खाली तेजासचे डोक्याकडील भाग हा मागच्या चाकाखाली आल्याने तो जागीच मृत झाला.दरम्यान येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, तर पोलिसांनी मृत तरुणाचे मृतदेह कर्जत उपजिल्ह्या रुग्णालयात नेले होते. दरम्यान या पुलावर कायम वाहनाची वर्दळ असते त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना येथील पोलीस प्रशासन हे घाई करू नका म्हणून सांगत देखील असतात परंतु काही चालक ओव्हरटेक करण्याच्या नादात असतात त्यामुळे असे अपघात घडतात म्हणून पोलिसांकडून सांगण्यात येत आहे,सदर पूल अरुंद असल्याने येथे नव्याने पुलाचे काम देखील सुरू आहे,त्यामुळे येथे लवकरात लवकर नवीन पुलाची बांधणी व्हावी म्हणून आता मागणी देखील पुढे येत आहे.
0 Comments