दीपक जगताप खालापूर १२ एप्रिल,
कर्जत बाजार पेठ येथे श्री शनी मंदिरात भाजपच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन युवा नेते तथा उद्योजक किरण ठाकरे यांनी केले होते. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.कर्जत शनी मंदिरात बुधवारी शिबीराचे आयोजन केले येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी युवा नेते किरण ठाकरे , नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, सरस्वती चोधरी, अभिजित पटेल युवा शहर अध्यक्ष, अभिषेक तिवारी, प्रकाश पालकर, मिनेश म्हसने दिनेश भरकले , एड. प्रीती तिवारी , हरीश ठाकरे दर्शना बोराडे, राणी ढगे, गीतांजली देशमुख, जयेश ठाकरे, विशाल कोकरे, नवीन देशमुख, राजेश ठांणगे, कल्पेश पवार, सुजर रावळ , पुनम रावळ, संजय कराळे आदी पदाधिकारी, कार्यकारी उपस्थित होते.
दिवसेंदिवस आजार हे सातत्याने वाढत असते.त्याच बरोबर आपल्याला कोणत्याही आजारांची कल्पना येत नाही काही वेळा आपण त्या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे काही दिवसात आजारा हा गंभीर रुप धारण करीत असतो.मात्र ते होवू नये ही आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी आरोग्य तपासणी समवेत ही रुग्णांना या आजारा समवेत मार्गदर्शन केले.आजचे वाढत जाणारे आजार हे सर्व सामान्य नागरिकांच्या अवाक्या बाहेर असून आजारावर उपचार करण्याचा करण्यास प्रत्येक जण असक्षम होत आहे यामुळे पुढिल धोके जाणून घेण्यासाठी बहुसंख्य रुग्णांनी आपली शारीरिक तपासणी करुन घेतली.
या शिबिरात ई.सी.जी, बी.एम. आय, रक्तदाब तपासणी, मोफत वैद्यकीय तपासणी, हाडांचे विकास तपासणी, हृदय विकार तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, डायबेटिस तपासणी असे सर्व रोगांचे निदान, उपचार केले जाणार असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले आहे.
0 Comments