शासनाचा लाखो रुपये खर्च हा ठेकेदारासाठीचं?गावातील समस्याने मात्र घर पोखरलं



 अजय गायकवाड                                                  नेरळ / कर्जत १४ एप्रिल,

                  शासनाचा लाखो रुपये खर्च हा ठेकेदारासाठीचं आजवर खर्च केला जातो अशी म्हण आहे,तर गावातील  समस्याने मात्र घर पोखरलं,ग्रामस्थांची परवड मात्र काही केल्या थांबेना असे झालं, असाच प्रकार सध्या पाताळगंगा न्यूज पोर्टल ने बाहेर काढला.

            कर्जत तालुक्यातील आजही ग्रामीण भागातील गावात एक ना अनेक समस्या आहेत त्यातही दुर्गम भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन विविध स्थरावर प्रयत्न करीत आहेत,विविध योजना राबवित आहेत, निधी देखील खर्च करीत आहेत,परंतु खरंच या योजना आणि त्या योजनेचा निधी त्या कामसाठी योग्य प्रकारे खर्च होतो का?आणि तो किती होतो?त्या शिवाय खर्च करून तेथील गावातील ती समस्या सुटली का की केवळ ठेकेदाराचे खिशे भरून आपलाही हेतू साध्य करायचा असे एक ना अनेक प्रश्न उपस्थितीत होताना दिसून येत असताना पाताळगंगा न्यूज पोर्टल ने असाच एक प्रकार उघडकीस आणला.

         रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेले  महसूल विभागाच्या नकाशावरील भोपळेवाडी गाव पाणी टंचाई ग्रस्त गाव म्हणून एक नंबर वर पाहिले जात असताना गावकऱ्यांच्या मागणी नंतर रायगड जिल्ह्या परिषदेच्या बांधकाम विभागाकडून गावात स्थानिक आमदार निधीतून दोन वर्षांपूर्वी एक विहीर बांधण्यात आली,यासाठी 13 लाख रुपयांहून अधिक रुपयांचा निधी खर्च केला गेल्याचे येथील लावलेल्या पाटीवरून दिसून येते.

               खैर माता मजूर सामाजिक संस्था मर्यादित संस्थेला  या कामाचे ठेके दिलेले दिसत आहे.परंतु सध्या या विहिरीवर जाण्यासाठी रस्त्याच नसल्याचे चित्र आहे,झालेल्या पावसात रस्ता तर विहिरीच्या बाजूची मातीच वाहून गेली आहे,विहीर अधांतरी राहिलिली दिसत आहे,ग्रामस्थांनी काम करताना काही आगावू सचुना देखील केल्याचे सांगण्यात आलं परंतु याकडे ठेकेदार आणि प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्षित केल्याने हा निधी खर्च करून फुकटच गेल्याचे येथील ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते गणपत ठोंबरे सांगत आहेत.

         गावाच्या नदीतील पाणी पूर्ण अटून गेले आहे,पाण्यासाठी जी उरली सुरली अशा होती ती म्हणजे शासनाने बांधलेली विहीर परंतु सध्या विहिरीत पाणी असून ही ते पिऊ शकत नसल्याने खाल्लं तरी मारतोय आणि नाही खाल्लं तरी मरणारच अशीच काहीशी अवस्था होऊन बसली.विहिरीतील पाणी अद्याप ही पिण्या योग्य नाहीं कारण ठेकेदाराकडून ते काम पूर्ण केल्यानंतर विहीर साफ देखील केले गेले नसल्याने गावाची पाण्याची परवड आहे तशीच आहे.महिलांना घराचा उंबरा ओलांडून एकटे रानावनात जाऊन डवऱ्याचे पाणी आणावे लागत असल्याचे देखील येथील ग्रामस्थ सांगत आहेत.

     विहिरीतील पाणी उचलण्यासाठी पाईपलाईन साठी 24 लाखांचा वेगळा रुपयांचा निधी प्रशासनाने खर्च केला  परंतु याला ही दोन वर्षांचा कालावधी लोटला ठेकेदाराने अद्याप साठवण टाकी सुद्धा बांधली नसल्याचा आरोप होतो.

        खरं तर गावाची तहान भागवण्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च केले गेलेत, परंतु प्रत्येक्षात गावतील स्थानिक नागरिकांचे मत विचारत घेवून कामे केलेली गेलेली दिसत नसल्याने भयाण परिस्थिती समोर आली,अशीच जर काहीशी परिस्थिती काही दिवस राहिली तर येणाऱ्या मान्सून काळात शासनाचा लाखो रुपये पाण्यात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            एकूणच शासन गावाच्या समस्या सोडवण्याचा नावाखाली लाखो रुपये खर्च हा ठेकेदारासाठीचं आजवर करीत आल्याची म्हण आहे,तर गावातील  समस्याने मात्र घर पोखरलं,ग्रामस्थांची परवड मात्र काही केल्या थांबेना असे झालं, यावर कोणाचे वचक नाही प्रशासन याकडे पाहत किंवा जागेवर पोहचत नाही,कामे पूर्ण होवोत की न होवो ठेकेदार तर पैसे काढून घेतो अखेर परिस्थितीचा सामना तर हा केवळ सामान्य जनतेलाच करावं लागतो हे मात्र खरं.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान