माथेरान घाटात बर्निग कारचा थरार,.चालक प्रवाशी थोडक्यात बचावले

 


अजय गायकवाड : प्रतिनिधी                                  नेरळ / कर्जत ८ एप्रिल,                                               

                   माथेरान घाटात एका पर्यटक वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे,दरम्यान या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी कार जळुन खाक झाली आहे.हुंडाई कंपनीची CNG आय टेन ही कार असून या मध्ये दोन प्रवाशी प्रवास करत होते.दरम्यान ही आग कारचा पेट्रोल पाईप फाटला असल्याने लागली असावी असा अंदाज नागरिकांनी लावला.

                 जगतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान फिरण्यासाठी म्हणून उल्हास नगर येथील दोन व्यक्ती आपल्या हुंडाई कंपनीची CNG आय टेन या खाजगी वाहनाने सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आले होते,दरम्यान माथेरान घाट चढत असताना प्रसिद्ध असा जुमापट्टी स्थानकातील वरच्या धबधबा येथील चढावावर कारच्या पुढील भागातून आग पेटल्याचे चालकाचा निदर्शनात आले दरम्यान सावधगिरी बाळगत चालकांने कार रस्त्यात उभी करीत कार बाहेर सुखरूप पडले होते.यावेळी रस्त्यावरील वाहतूक बाधित झाल.      

                   


                                                 
 दरम्यान कारने अचानक भडका घेत कार जळून खाक झाली,यावेळी येथील नेरळ टॅक्सी चालक मालक संघटना व  ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका अधिक असल्याने कार पूर्णतः जळाली आहे.कार CNG गॅस असून घाटात चालक हा कार पेट्रोल वर चालवत असताना पेट्रोल पाईप फाटल्याने हा प्रकार घडला असावा असा अंदाज येथील वाहन चालकांकडून लावला जात आहे,,घटनास्थळी माथेरान अग्निशमन दलाचे वाहन पोहचले होते परंतु तो पर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली,तर JCB च्या साह्याने कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,