अजय गायकवाड : प्रतिनिधी नेरळ / कर्जत ८ एप्रिल,
गोवंशीय जनावरांची हत्या करू नका म्हणून जनजागृती करणाऱ्या मुस्लिम बांधवालाच त्यांच्याच भाऊबंधकीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील सालोखं गावात घडलाय,दरम्यान रक्ताच्या थारोळ्यातच माखलेल्या तरुणाने नेरळ पोलीस ठाण्यात जावून ठाण मांडल्याने जखमी तरुणाला पोलिसांनी उपचारासाठी प्रथम रुग्णालयात हलविले आहे.
कर्जत तालुक्यातील सालोख ग्रामपंचायत गावात राहणाऱ्या जरार ताहीर सैरे या उच्च शिक्षित तरुणाला शुक्रवार 7 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मशिदीत नमाज पठाण करीत असताना गावातीलच काही तरुणांनी मशिदीतून बाहेर आणून लोखंडी व काही कौलारू साहित्य वापरून जबर मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले होते,दरम्यान या मारहाणीत तरुण रक्ताच्या थारोळ्यात असताना जागरूक ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत त्याला सोडवले.मात्र रक्ताच्या थारोळ्यात असणाऱ्या जरार ह्याला मोटरसायकल वर नेरळ पोलीस ठाण्यात आणल्या नंतर या तरुणाने पोलीस ठाण्यातच ठाण मांडून आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत ओरडून सांगत असताना कायद्यात गो हत्या करणे हा गुन्हा असल्याचे आपण सांगत असल्यामुळे आपल्यावर हा जीवघेणा हल्ला केला असल्याचे सांगितले.
दरम्यान नेरळ पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत जखमी तरुणाला अधिक उपचारासाठी कर्जत येथून पुढे MGM रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आल्याचे सांगितले.दरम्यान ही हाणामारी प्रथम दोन लहान मुलांच्यात झालेल्या वादावरून झाल्याचे बोलले जात आहे,तर एकीकडे जखमी तरुण हा उच्च शिक्षित असून 'गो'हत्या करू नका म्हणून गावात जनजागृती करीत असल्याने त्यावरून त्याला मारहाण केल्याचे देखील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे,स्वतः जखमी जरार ताहीर सैरे यांनी ही आपल्या माहितीत म्हंटले आहे,एकूणच शुल्लक कारणावरून झालेल्या वादाची याला किनार दिसत असून मारहाण करणाऱ्यानी देखील जीवे ठार मारण्याचा प्रयत्न येथे केल्याचे दिसून येत असल्याचे दिसत आहे,तर तरुणाला घटनास्थळी मारून झाल्याच्या नंतर देखील तरुणांनी नेरळ पोलीस ठाण्याच्या आवारात मारल्याचे बोलले जात आहे,त्यामुळे नक्की याबाबत कोणते कारण आहे याबाबत नेरळ पोलीस तपास करीत आहेत,सदर जखमी तरुण तर त्याच्यावर हात उगारणारे आरोपी तरुण हे नाते संबंधात येत असल्याचे देखील बोलले जात आहे.सदर आरोपी हे घटनस्थळाहुन फरार झालेत.तर याबाबत आता जखमी तरुणाचे वडील ताहीर सैरे यांनी देखील नेरळ पोलीस ठाण्यात मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.यामध्ये आरोपी अकील मुश्ताक बुबेरे, जाकीर मुश्ताक बुबेरे, शगफ शकील बुबेरे, अरसलान शकील बुबेरे, शोएब शकील बुबेरे, शाकिब मुस्ताक बुबेरे, फरहान फारुख बुबेरे, शकील मुस्ताक बुबेरे यांची नावे देण्यात आली आहेत.
एकूणच काही दिवसांपूर्वी दामत ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांची कातडी सापडून आल्यानंतर खळबळ माजली होती तर आता मुस्लिम समाजाकडून तरुण गो हत्या प्रकरणावर जनजागृती करीत सलेला जरार ताहीर सैरे या तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात परस्परविरोधी देखील लहान मुलाला मारहाण केल्या प्रकरणी तक्रार झाल्याचे समजते.त्यामुळे आता या घटनेत जखमी जरार ताहीर सैरे मारहाण प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकरी कर्जत विजय लगारे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तर आरोपींवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ९३/२०२३ भादंवि कलम ३०७,१४३,१४४,१४७,१४८,१४९,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments