धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांना आदर्श सामाजिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्रदान धनगर समाजात आनंदाचे वातावरण

             


                                                                           दतात्रय शेडगे : प्रतिनिधी                             खोपोली :३ एप्रिल

गोर गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे धनगर समाजाचे डॅशिंग नेतृत्व, राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष, वीर हुतात्मा शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक, बबन शेडगे यांना खालापूर प्रेस क्लबचा आदर्श सामाजिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार २०२३ हा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मिळाल्याने धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे, 

                सह्याद्रीच्या कुशीत घाटमाथ्यावर दस्तुरी येथे राहणारे  बबन शेडगे यांना लहान पणापासूनच समाज सेवेची आवड आहे,  समाजातील एखादया व्यक्तीवर रात्री अपरात्री प्रसंग आला तर ते कसलीही पर्वा न करता त्यांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना न्याय मिळवून देतात, 
        धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या    बोरघाटातील  वीर हुतात्मा शिंग्रोबा मंदिरासाठी  त्यांनी समाजातील  भरत कोकरे,बबन खरात,  बाळासाहेब आखाडे, बाळासाहेब झोरे  नामदेव हिरवे,  दीपक आखाडे, ह्या व्यक्तींना एकत्र करून   बोरघाटात शिंग्रोबा देवाचा उत्सव भरवून समाजाला एकत्र येण्याचे व्यासपीठ तयार करून दिले, त्यांनी चालू केलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव आजही मोठ्या उत्साहात त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडतो, 
        रायगड आणि पुणे जिल्ह्यातील धनगर समाज हा आजही डोंगर दर्यात राहणार असून काही वाडी वस्त्यांवर मूलभूत सुविधा नाहीत,मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संकट आल्यावर बबन शेडगे हे त्या ठिकाणी पहिले पोचतात, गोर गरीब मुलांचे शिक्षण असो, एखाद्याची आर्थिक परिस्थिती , कोणाचे लग्न असो, किंवा कोणाचे घरी दुःखाचे कारण अश्या कोणत्याही प्रसंगाच्या वेळी बबनशेठ पाहिले धावून जात असतात.
                 त्यांच्याच या कार्याची दखल घेत आज त्यांना खालापूर प्रेस क्लबचा आदर्श सामाजिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार २०२३ हा मिळाल्याने समाजाला त्यांचा अभिमान असून धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे, तर प्रत्येक समाज बांधव  भेटून त्यांचे अभिनंदन करून  पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे.समाजसोबतच त्यांचा राजकारणातही मोठे वर्चस्व असून  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री  आमदार महादेव जानकर आणि बहुजनांचे नेते भाजपचे डॅशिंग नेतृत्व दमदार आमदार गोपीचंद पडळकरासोबतही त्यांचे जवळचे संबंध आहेत, तर त्यांचे मोठे बंधू स्व कृष्णा शेडगे हे खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात