समाधान दिसले : प्रतिनिधी
खालापूर : ३ एप्रिल,
रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लब चा १५ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात खोपोलीतील महाराजा मंगळ कार्यालयात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याचे उघ्दाटन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते पार पडले असून याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, रेश्मा साळुंखे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, म.रा.म.पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे, उपाध्यक्ष मोहन जाधव, तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरिक्षक बाळा कुंभार, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नरेश पाटील, माजी नगरसेवक कुलदिप शेंडे, अमोल जाधव, मोहन औसरमल, मनसेचे जे.पी.पाटील, मनिष खवळे, अभिषेक दर्गे, नानू सावंत, सुनील साठे भाजपा कोषाध्यक्ष सनी यादव, पं.स. उपसभापती विश्वनाथ पाटील, सदस्य उत्तम परबळकर, महिला सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा खेडकर, शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर - पत्रकार मंडळी उपस्थित होते. तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खालापूर प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे, अनिल पाटील, एस.टी.पाटील, रविंद्र मोरे, समाधान दिसले, काशिनाथ जाधव, संतोषी म्हात्रे, राज साळुंखे, नवज्योत पिंगळे, भाई जगन्नाथ ओव्हाळ, प्रविण जाधव आदींनी मेहनत घेतली
तर वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात आदर्श सामाजिक पुरस्कार - बबन शेडगे, आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार - माजी नगरसेवक किशोर पानसरे, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार - तहसीलदार आयुब तांबोळी, आदर्श महिला पुरस्कार - अँड.मोहीनी वैद्य ,आदर्श बिल्डर पुरस्कार - दिपेंद्र सिंह भदोरीयख, आदर्श सरपंच पुरस्कार - उषाताई हनुमंत पिंगळे, आदर्श डॉक्टर पुरस्कार - डॉ.अनिलकुमार योध्दा शाह, आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार - सावरोली ग्रामपंचायत, आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार - जगदीश मरागजे, आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार - लायन्स क्लब आँफ खोपोली, अध्यात्मिक पुरस्कार - ह.भ.प.रामदासभाई महाराज पाटील, आदर्श कामगार पुरस्कार - ईश्वर कासार, आदर्श उदयोजक पुरस्कार - प्रमोद महाडिक, आदर्श शिक्षक - पुरस्कार सुनील कटके, तसेच र.वा. दिघे राज्य स्तरीय पत्रकार पुरस्कार Zee 24 taas आघाडीच्या वृत्त निवेदिका रेश्मा साळुंखे - धामणकर तर जीवन गौरव पुरस्कार खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांना आमदार महेंद्र थोरवे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे व इतर मान्यवरांनी यांनी खालापूर प्रेस क्लब च्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेत कौतुक केले. अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी प्रास्ताविक, जगदीश मरागजे यांचे उत्तम सूत्र संचालन व आभार प्रदर्शन खालापूर प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांनी मानले .पुरस्कार सोहळ्यात महेशबुवा देशमुख यांचा बहारदार मराठी, हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
0 Comments