गजबजलेल्या नागरी वस्तीत महिलेची सोनसाखळी चोरून चोर फरार

 



अजय गायकवाड : प्रतिनिधी
नेरळ / कर्जत ३ एप्रिल 

      नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या खांडा परिसरात बसची वाट पाहत बसलेल्या महिलेची दोन तोळे सोन्याची गंठण मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यानी गळ्यातून हिसकावून चोर फरार झाला.दरम्यान ही घटना नागरिकांच्या समोर घडल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे,तर पीडित महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात धावघेत तक्रार दाखल केली आहे.
                 माथेरान येथे राहणारे ४५  वर्षीय महिला आखाडे ह्या आपल्या पती सोबत माथेरान येथे जाण्यासाठी म्हणून नेरळ खांडा येथे बसची वाट पाहत होते दरम्यान,बसला येण्यासाठी उशीर असल्याने आखाडे यांचे पती हे बाजूला खरेदीसाठी गेले होते तर महिला ह्या बस स्टॉपच्या कठड्यावर बसून होत्या यावेळी अर्धवट तोंड झाकलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणाने आखाडे यांच्या जवळ येत गळ्यातील ७०  हजार रुपये किमतीची दोन तोल्याची सोन्याची गँठण चोरून नेली दरम्यान हा चोर युनियन बँक येथील रस्त्यावर काळ्या रंगाची मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाच्या सोबत बसून फरार झाला.


              ही घटना ३१  मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली,दरम्यान सोनसाखळी चोरणारे हे चोर cctv कॅमेरात कैद झालेत, घटनास्थळी नेरळ पोलीस हजर होत cctv कॅमेरा चेक केले असता अर्धवट तोंड बांधून आलेले हे चोर बदलापूर दिशेने गेले असल्याचे पोलिसांनी सांगितलें आहे.एकूणच भर दिवसा मोटारसायकल वर आलेल्या चोरांनी नागरी वस्तीत चोरी केल्याने चोरांची दहशत वाढली असल्याचे बोलले जात आहेत तर नागरिकांच्या देखत ही घटना घडली असल्याने यावेळी नागरिकांनी देखील कुठली हालचाल केली नसल्याने चोरांना पळून जाण्यास सोपे झाले होते.
                 एकूणच नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस श्रीकांत राजाराम काळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात