अजय गायकवाड : प्रतिनिधी नेरळ / कर्जत ८ एप्रिल,
आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून नेरळ येथील कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तु व खाऊ वाटप केला.दरम्यान यावर शालेय विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसून येत होता,तर यावेळी विद्यार्थ्यांना शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे मतदारसंघात सुरू असलेले विकास कामे तर शालेय विद्यार्थ्यांप्रति असलेले प्रेम यावर माहिती देत आमदार याना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा आपल्या सहकारी मित्राकडून व ग्रामस्थांकडून दिल्यात.
कर्जत खालापूर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा ७ एप्रिल रोजी ५० वा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमाने जल्लोषात साजरा करण्यात आला.दरम्यान आपल्या नेत्याला उदंड आयुष्य मिळावे यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या चाहत्या वर्गाकडून ठिकठिकाणी बॅनर लावून तर प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून थोरवे यांना शुभेच्छा दिल्यात तर काही ठिकाणी कार्यकर्त्यानी गोरगरीब नागरिकांना घर उपयोगी वस्तूची मदत केली,नेरळ येथील शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर देशमुख व त्यांच्या सहकारी मित्रांनी एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तर खावू वाटप केला आहे,
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद मराठी शाळा तर उर्दू शाळेलतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे,मुलांना दिलेल्या भेट वस्तू मुळे विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसून येत होता.यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर देशमुख,महिला संघटिका जान्हवी साळुंखे,सरपंच उषा पारधी,किसन शिंदे,अंकुश शेळके,जयवंत साळुंखे,सचिन खडे,सदस्य गीतांजली देशमुख,जयश्री मानकामे,उमा खडे, तर वर्षा बोराडे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments