पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
७ मार्च,
जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या परिसरातील असलेली माजगांव,आंबिवली,वारद या गावातील ग्रामस्थांची जुबिलियन्ट फूडवर्क लि,भारतीय फाउंडेशन यांच्या माध्यमातून रँडम ब्लड शुगर,कोलेस्ट्रॉल तपासणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर माजगांव, आणी वारद करण्यात आली.यावेळी नागरिकांनी आपली तपासणी करुन घेतली.विशेष म्हणजे ह्या तपासण्या विनामुल्य असल्यामुळे अनेकांनी या शिबीरांचा लाभ घेतला.
दिवसेंदिवस दिवस वातावरणात सातत्याने बदल घडत आहे.शिवाय व्यक्तीला कोणत्या आजारांने ग्रासले जाईल यांचा काही नेम नसतो.मात्र आपण वेळोवेळी तपासणी करुन घेतली तर आपल्याला होणाऱ्या आजारावर निधान तातडीने लक्षात येते.यामुळे कमी खर्चात अथवा आपला वेळ आणी जिव वाचला जात असतो.आज अनेकांना शुगर,कोलेस्ट्रॉल असते मात्र आपल्या निदर्शनास येत नाही,यामुळे भविष्यात तो आजार गंभीर होत असतो यामुळेच आपण तपासणी करुन घ्यावी असा सल्ला सोशल वेलफेअर व्यवस्थापक निलेश ढगे यांनी ग्रामस्थांना दिले.
गेले अनेक महिने जुबिलियन्ट फूडवर्क लि,भारतीय फाउंडेशन यांच्या माध्यमातून १८ महिने गावोगावी जावून नागरिकांना मोफत सल्ले तसेच औषध दिली जात आहे.त्याच बरोबर ही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम करीत आहे, खालापूर तालुक्यात ५२ इंच टिव्ही देण्यात आली यामध्ये पहली ते बारावी विद्यार्थ्यांना ओडिओ तसेच व्हिडिओ च्या माध्यमातून पाठपुस्तक आभ्यास या मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.रायगड,खालापूर सह ११२ टीव्ही देण्यात आल्या आल्यांचे व्यवस्थापक यांनी सांगितले.
या आरोग्य तपासणी या परिसरातील अनेक रुग्णांनी सहभाग घेण्यात आला.विशेष म्हणजे हे रिपोर्ट त्यांच्या मोबाईल वर देण्यात येणार आहे. यावेळी या शिबिरासाठी डॉ. भाग्यश्री जगदाळे,सोशल वेलफेअर व्यवस्थापक - निलेश ढगे,प्रकल्प समन्वय - कल्पेश मालुसरे,डॉ. एस.आर.एल. डायनोस्टिक शितल चौधरी, फार्मसी - धनश्री कनोजे त्याच समवेत ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सदस्य - रमेश जाधव,भरत पाटील,आशा वर्कर - कविता भोइर,पोलीस पाटील वारद - मनीषा शिंदे
0 Comments