पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
३ एप्रिल,
रायगड जिल्हात श्रीमंत मानली जाणारी ग्रुप ग्राम पंचायत वडगांव येथे गुरुचरण जागेवर अतिक्रमणाचा सुळसुळाट सुरु असून मात्र ग्रुप ग्राम पंचायत वडगाव यांचे अतिक्रमणा कडे साफ दूर्लक्ष करीत आहेत वाशिवली येथिल पाताळगंगा नदीच्या परिसरात सर्व्हे १/१ /अ /गुरुचरण ( गायचरण ) जागा असून या ठिकाणी आदिवासी व नागरिकांनी या ठिकाणी अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली. आहेत मात्र यांच्यावर कोणतेही कारवाही होत नसून दिवसेंदिवस हे अतिक्रण वाढत असल्यामुळे आम्ही ,ग्रामस्थांनी बांधकामावर संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.
सदर या ठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्यासाठी वाशिवली येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील,राम ठोंबरे, बाळा पाटील,आशोक शिवले,अतिष साळुंखे व ग्रामस्थांनी वेळोवेळी सासकीय उमरठे झिजवून कागदी घोडे नाचविले मात्र पदरी निराशा शिवाय काहीच पडले नाही.मात्र हे मतांचं राजकारण होत,असल्यांची चर्चा ग्रामस्थ यांच्या कडून ऐकण्यास मिळत आहे.मात्र या ग्रुप ग्राम पंचायत वडगांव हद्दीत अनेक अतिक्रमणे होत असतांना ग्रामपंचायत मात्र बघ्यांची भूमिका घेत आहे.तसेच तसेच मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश आहे की गुरुचरण जागेवरील अतिक्रमण कारवाई करून काढून टाकावे असे आदेश असूनही मात्र या कडे ग्राम पंचायत वडगाव जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.
वाशिवाली येथील गुरुचरण जागेवर अतिक्रमण केले यांसंदर्भात २२/२/२०२३ रोजी या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे असे तक्रारी पत्र ग्रामपंचायत वडगाव यांना देण्यात आले होते त्यावर पंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही.तसेच मा.उच्च न्यायालय मुंबई ६/१०/२०२२ च्या आदेशातील ५ ( V ) मध्ये नमूद केले आहे. की या पुढे गुरुचरण जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठी यासाठी आवश्यक ती उपाय योजना करावी. तसेच,दि.१७/११/२०२२ ते २३/११/२०२२ अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या त्यावर कारवाई न केल्याने या कडे दुर्लक्ष्य केल्यामुळे सर्व्हे नं. १/१ अ/गुरचरण जागेवर गेल्या महिन्यापासून ५ते ६ घरे बांधण्यात आली.आहेत
मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती खालापूर यांनी दि.१८/११/२००९ रोजी आदेश देण्यात आले की दि.१४/११/२००९ रोजी अंमलबजावणी करून संबंधित ग्रुप ग्राम पंचायत वडगांवचे ग्रामसेवक यांना गुरुचरण जागेतील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतू अतिक्रमणा वर कोणतीही कारवाई केले नाही.सदर झालेले अतिक्रमण काढावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील व ग्रामस्थ यांनी मा.कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्राम विकास विभाग मंत्री - गिरीश महाजन,मुख्य न्यायधिश उच्च न्यायालय मुंबई अश्या विविध ठिकाणी हे अतिक्रमण काढण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आले.आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी रायगड - म्हसे )मा.मुख्यकार्यकारी अधिकारी किरण पाटील व मा.तहसिलदार खालापूर आणि हा.गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर यांना प्रत्यक्षात भेटून अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी तक्रारी पत्र निवेदन दिले, त्यावर त्यांनी अतिक्रमणे काढून टाकण्याचे आस्वान दिले.परंतू आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी
चौकट
गुरुचरण जागेवर अतिक्रमण करुन घरे बांधली असून त्या संदर्भात त्यांस नोटीस दिली आहे.तसेच गुरुचरण किंवा खाजगी जागेत घरे बांधली का ? यासाठी जागा मोजणी करण्यात येणार आहे.त्याचबरोबर भुलेख अधिकारी,यांना पत्र व्यवहार करण्यात आले आहे.तसेच अजून कोणी कोणी घरे बांधली या संदर्भात चौकशी करुन तलाठी यांचे सहकार्य घेवून कारवाई केली जाईल.ग्रूप ग्राम पंचायत वडगांव ( ग्रामसेविका - रश्मी शिंदे )
0 Comments