पुणे सातारा रोडवरील धनकवडी येथील प्रसिद्ध चौकाला धर्मरक्षणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव , शिवाजीराव हिरवे पाटील. युवा मंच चा स्तुत्य उपक्रम


 
दत्तात्रय शेडगे                                                        खोपोली : ६ जून 

             पुण्यातील पुणे सातारा रोड वरील  धनकवडी येथील  चौकाला धर्मरक्षणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नाव देऊन नामफलकाचे उदघाटन करण्यात आले .पुणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या धनकवडी चौकाला अहिल्यादेवी होळकर चौक नाव दिले होते परंतु या ठिकाणी त्यांचा एकेरी उल्लेख होत होता यांची दखल घेत                                                        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८  वी  जयंतीचे औचित्य साधत शिवाजीराव हिरवे पाटील यांच्या संकल्पनेतुन या चौकात नामफलकांचे लोकार्पण करण्यात आले ,तसेच यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या जनसमुदायाच्या सहभागातून उत्साहात साजरी करण्यात आली, शहरातील विविध भागातील नागरिक जिल्ह्यातील विविध वाड्या वस्तीवरील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.                                                    यावेळी आमदार रवींद्र धंगेकर,आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक बाळासाहेब  धनकवडे, रासप नेते बाळासाहेब कोकरे, ॲड.संजय  माने, सरपंच धोंडिबा ढेबे, रासपा पुणे शहराध्यक्ष उमेश अण्णा कोकरे , आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना  शिवाजीराव हिरवे पाटील,यांनी तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी ढेबे, यांनी केले तर आलेल्या  प्रमुख पाहुण्यांचे स्वागत,त्ता डोईफोडे, अनिल मुंडकर, रामचंद्र ढेबे, सचिन ढेबे यांनी केले

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर