धनगर आरक्षण मोर्च्यात लाखोंच्या संख्येने सामील व्हा

 धनगर आरक्षण मोर्च्यात लाखोंच्या संख्येने सामील व्हा- युवा नेते गणेश बावदाने यांचे आवाहन 




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २ ऑक्टोबर,


                  धनगर समाजाला (एसटीचे  सर्टिफिकेट )धनगर आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने धनगर समाजाच्या मेळाव्याचे  आयोजन करून  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन केले आहे, हा मोर्चा ३ आक्टोबर २०२३  रोजी सकाळी १०  वाजता अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर   आयोजित केला आहे, तरी या मोर्चाला रायगड जिल्ह्यातून समाज बांधव, महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन असे आवाहन युवा नेते गणेश (बापू) बावदाणे यांनी केले आहे.
                 राज्यात गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाचा प्रत्येक राजकीय पक्षांनी फक्त मतांपुरता वापर केला असून आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण केली नाही, गेल्या अनेक वर्षे या मागणीसाठी धनगर समाजाला संघर्ष करावा लागत असून  आता थेट  उठ धनगरा  जागा हो ...आरक्षणाचा धागा हो ....हे ब्रीद वाक्य घेऊन  समाज रस्त्यावर उतरला आहे, 
                या मागणीसाठी यशवंत सेना यांच्या वतीने चौंडी येथे २१  दिवसापासून बेमुदत आमरण  उपोषण चालू आहे मात्र त्यांची २१ व्या दिवसानंतर सरकारच्या लेखी आश्वासनंतर उपोषण मागे घेतले आहे तर काही ठिकाणी दररोज मोर्चे, चक्काजाम आंदोलन करीत आहेत   त्यांना पाठींबा देऊन धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाने  आक्रमक पवित्रा घेतला असून संघटना, संस्था गट तट, बाजूला ठेवून  धडक मोर्च्याचे आयोजन केले आहे  या मोर्चात रायगड जिल्ह्यातून समाज बांधवांसह महिलांनीही  मोठ्या  संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते गणेश बावदाणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर